शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे सीवूड आंदोलन प्रकरण : अधिकाऱ्यांसोबत गैरवतर्णूक केल्याने काळेंवर गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 12, 2024 19:32 IST

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड सेक्टर ४२ येथे पालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाची ७ फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती.

नवी मुंबई : पालिका अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी उठाबशा काढायला लावण्याचे वक्तव्य करत कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका अभियंत्यांच्या तक्रारीवरून एनआरआय पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सीवूड सेक्टर ४२ येथे पालिकेमार्फत सुरु असलेल्या कामाची ७ फेब्रुवारीला अधिकाऱ्यांसह पाहणी केली होती. यावेळी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या निष्काळजीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप करत काळे यांनी ठेकेदार, पालिका अधिकारी यांना अपशब्द वापरला होता. परिणामी ८ फेब्रुवारीला ठेकेदारांनी मनसेच्या सीवूड येथील कार्यालयाला घेराव घालून काळे यांच्या वक्तव्याचा निषेध देखील व्यक्त केला होता. त्यावेळी काळे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर ठेकेदारांनी आंदोलन मागे घेतले होते.

काळे यांच्या विरोधात पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामध्ये आपण कामाच्या ठिकाणी पाहणी करत असताना गजानन काळे, अमोल आयवले यांनी त्याठिकाणी येऊन कामात अडथळा केला, उठाबशा काढण्याचे वक्तव्य करून अपमान केला अशी तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री गजानन काळे, अमोल आयवले यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMNSमनसे