शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये परप्रांतीय मच्छिविक्रेत्यांना मनसेचा चोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2022 15:53 IST

खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छि विक्रीचा व्यवसाय करतात.

लोकमत न्युज नेटवर्क पनवेल:खारघर शहरात परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांनी धुमाकूळ घातला आहे.घरोघरी जाऊन मच्छि विक्री करणाऱ्या या परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांमुळे स्थानिक व पारंपरिक मच्छि विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आल्याने दि.30 रोजी मनसेचे शहर अध्यक्ष गणेश बनकर यांनी मच्छि विक्रेत्या महिलांसोबत परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांना चोप दिला.

 खारघर शहरातील से.15 याठिकाणी मच्छि मार्केट मध्ये स्थानिक कोळी महिला मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात.मात्र बाहेरून परप्रांतीय विक्रेते येणाऱ्या ग्राहकाला बाजारपेठेच्या बाहेरच मच्छि विकून मोकळे होत असल्याने या स्थानिक मच्छि विक्रेत्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे.याबाबत या महिलांनी मनसेचे शहर अध्यक्ष गणेश बनकर यांच्याकडे दाद मागितली होती.रविवार दि.30 रोजी या महिलांच्या उपस्थितीत बनकर यांनी परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांना मनसेचा खाक्या दाखवत शहरात अनधिकृतपणे मच्छि विक्री न करण्याचा ईशारा दिला.मनसेच्या या आंदोलनानंतर काही परप्रांतीय मच्छि विक्रेत्यांनी शहरातून पळ काढला.स्थानिक पोलीस प्रशासन अथवा पालिकेच्या माध्यमातून या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी गणेश बनकर यांनी केली आहे.या परप्रांतीय मच्छि विक्रेते विक्री करत असलेल्या मासळीच्या दर्जा बाबत देखील बनकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

टॅग्स :MNSमनसे