शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:18 IST

कोपरखैरणे येथे एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणे येथे एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या पंधरा दिवसांतील ही दुसरी घटना आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनांमध्ये आरोपी एकच असल्याचे सीसीटीव्हीवरून स्पष्ट झाले आहे.कोपरखैरणे येथे राहणाºया पंधरा वर्षीय मुलीवर अज्ञात तरुणाने अतिप्रसंग करुन पळ काढला आहे. पीडित मुलीच्या वडिलांचा व्यवसाय असून ती दुपारी वडिलांसाठी जेवण घेवून गेली होती. यादरम्यान सदर तरुणाने तिचा पाठलाग केला. मुलीला घरी आली असता वडिलांनी पुन्हा बोलावल्याचे सांगून सोबत घेऊन गेला. त्यानंतर जवळच बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन मुलीवर अतिप्रसंग करुन पळ काढला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, तो तरुण दिसून आला. यानुसार त्याच्याविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस त्याचा शोध घेत असतानाच पंधरा दिवसांपूर्वी त्यानेच एपीएमसी आवारात देखील एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचे कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक भरत कांबळे यांनी सांगितले.दोन महिन्यांपूर्वी खारघर, सीबीडी यासह मुंबईतील अल्पवयीन मुली अशाच घटनेला बळी पडल्या होत्या. अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्यावर अतिप्रसंग केले जात होते. मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसतानाच दुसरा तरुण समोर आला आहे. त्यामुळे शहरातील अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेची चिंता पालकांना सतावत आहे. अशा विकृत व्यक्तींवर सक्त कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.