नवी मुंबई - शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलीचा रात्री उशिरा मृतदेह आढळून आल्याची घटना तुर्भे एमआयडीसी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला असता मुलीने प्रतिकार केला. यामुळे त्याने दगडाने तोंड ठेचून तिची क्रूरपणे हत्या केली. तिच्यावर अत्याचार झाला आहे की नाही हे पडताळणीसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अत्याचाराला प्रतिकार केल्यानेअल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीची केली हत्या
By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 26, 2025 15:15 IST