शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

ठोक मानधनावरील कर्मचा-यांना आता मिळणार किमान वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 02:29 IST

महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांना किमान वेतन लागू करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये ठोक मानधनावर कार्यरत असणा-या कर्मचा-यांना किमान वेतन लागू करण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, ५२९ कर्मचाºयांना तत्काळ लाभ होणार असून, त्यांच्या वेतनासाठी वार्षिक ४ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहेत.महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ३२७९ पदांना शासनाची मंजुरी आहे. सद्यस्थितीमध्ये २३३९ कर्मचारी विविध पदांवर काम करत आहेत. आस्थापनेवरील तब्बल ९४० पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने कर्मचाºयांची संख्या अपुरी पडत असल्याने विविध विभागप्रमुखांकडून ठोक मानधनावर करार पद्धतीने कर्मचाºयांच्या नेमणुकीबाबत वारंवार मागणी करण्यात येते. यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५३ (३)मधील तरतुदीअन्वये सद्यस्थितीत विविध विभागांसाठी ६०३ कर्मचारी वेळोवेळी सहा महिन्यांकरिता करार पद्धतीने नेमण्यात आले आहेत. सद्यस्थितीमध्ये सर्वांना ठोक मानधन देण्यात येत आहे. यापुढे सर्वांना किमान वेतन देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार आहे.कुशल कामगारांना १४ हजार, अर्धकुशल कामगारांना १३ हजार व अकुशल कामगारांना ११५०० रुपये किमान वेतन देण्यात येणार आहे. विशेष भत्ता, घरभाडे भत्ता, बोनस, भविष्य निर्वाह निधीचाही त्यामध्ये समावेश असणार आहे. यासाठी पालिकेला महिन्याला ३८ लाख १७ हजार व वर्षाला ४ कोटी ५८ लाख रुपये अतिरिक्त बोजा पडणार आहे.>पदनाम कार्यरतकर्मचारीकनिष्ठ अभियंता ४१बायोमेडिकल इंजिनीअर ०१प्रदूषण निरीक्षक ०१लिपिक संवर्ग २३३वर्ग सहायक ०८दूरध्वनी चालक ०३सर्व्हेअर ०१वाहनचालक ३८डेंटल हायजिनिस्ट ०१शस्त्रक्रिया सहसहायक ०४लॅब असिस्टंट ०२वैद्यकीय समाजसेवक ०३>पदनाम कार्यरतकर्मचारीबायोमेडिकल सहायक ०१प्रयोगशाळा तंत्रज्ञ ०३एएनएम १३क्ष किरण अटेंडंट ०५औषधनिर्माता ११नाभिक ०३आरोग्य कर्मचारी ३३शिपाई ४३नोटीस बजावणीस २२समूह संघटक २५उपस्वच्छता निरीक्षक ११इतर १८