शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भेतील गोदामातून लाखोंचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 02:33 IST

तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग आॅपरेशन सुरू आहे. शहरात गस्त वाढविण्यात आली असून याआधीही कोपरखैरणे, पनवेल परिसरातून देशी-विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.तुर्भे एमआयडीसी येथील साईनाथ ग्रेनाइट या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या पथकाने शनिवारी रात्री त्या ठिकाणी छापा टाकला. या वेळी गोदामाच्या एका भागामध्ये बॉक्समध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. त्यापैकी काही बॉक्स पोलिसांनी तपासले असता, त्यामध्ये महागडी दारू आढळली. पोलिसांनी केलेल्या मूल्यमापनामध्ये या दारूसाठ्याची किंमत ७३ लाख ६२ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. विदेशी मद्यसाठ्याबाबत पोलिसांनी गोदाम सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता, त्याने कस्टमच्या लिलावात हे मद्य खरेदी केल्याचे सांगितले. त्याबाबत पोलिसांनी कागदपत्रांची विचारणा केली असता, त्याची पूर्तता होऊ शकली नाही. यानुसार गोदाम मालक आशिष सिंग व कर्मचारी किसन कामकर यांच्याविरोधात तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी कामकर यास अटक करण्यात आली असून, मालक सिंग याचा पोलीस शोध घेत आहेत.आचारसंहितेच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणात सापडलेल्या विदेशी मद्यसाठ्याचा निवडणुकीशी संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुसार गुन्हे शाखा पोलीस अधिक तपास करत आहेत.शहरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यापासून गेल्या १३ दिवसांत नवी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाया सुरू आहेत. त्यामध्ये अग्निशस्त्र, तलवार, कोयते यासह गावठी दारू पकडण्यात आली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलिसांचे छापासत्रकोपरखैरणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ४२० लीटर देशी दारू साठा जप्त केला होता. याशिवाय पनवेल, एपीएमसी व तुर्भे एमआयडीसी परिसरातही अवैध दारूविक्रीच्या धंद्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया करून काही जणांना अटक करण्यात आली आहे.प्रत्येक निवडणुकीपूर्वी पोलिसांकडून अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाया केल्या जातात. लोकसभेनंतर काही महिन्यांतच विधानसभा निवडणुकीचे संकेत असल्याने प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवायांवर पोलिसांनी भर दिला आहे. त्याकरिता शहरात कोम्बिंग आॅपरेशन व नाकाबंदी करण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई