शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जत्रा, फ्लेमिंगोसह अनेक आकर्षक जलचर पक्षांचा मुक्त संचार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 20:36 IST

दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसु लागले आहेत.

मधुकर ठाकूर 

उरण: दरवर्षी थंडीच्या काळात हमखास दृष्टीस पडणारे विविध जलचर आणि फ्लेमिंगो पक्षी उरण परिसरातील विविध पाणथळी जागा, सागरी किनाऱ्यावर दिसू लागले आहेत. आकर्षक जलचर पक्षांच्या मुक्त संचारामुळे उरण परिसरात स्थलांतरित पक्ष्यांची जणू काही जत्राच भरली असल्याचे चित्र आहे. 

उरण परिसरात विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर होणार्‍या दगड-मातीच्या प्रचंड भरावामुळे पाणथळी जागा, पक्ष्यांच्या वास्तव्याची ठिकाणे नष्ट झाली आहेत. पक्षांच्या वास्तव्यांच्या, आश्रयांच्या जागा नष्ट झाल्याने परदेशातून हजारो मैलांचे अंतर कापून येणार्‍या स्थलांतरीत विशेषतः फ्लेमिंगो पक्षांची संख्या मागील काही वर्षांपासून कमालीची रोडावली होती. त्यानंतर कोरोना महामारीतील दोन वर्षात परिसरातील औद्योगिक धडधड थंडावली होती.

यामुळे उरण परिसरातील पाणथळी जागा, खाडी किनाऱ्यांवर शांततेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच स्थलांतरित पक्षांच्या वास्तव्यासाठी वातावरण पोषक बनले आहे. त्याशिवाय स्थलांतरित पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी पाणथळी जागा, खारफुटी,कांदळवने वाचवण्यासाठी पर्यावरणवादी संघटनांनी संघर्ष करीत सरकारवर दबाव आणला होता.

न्यायालयातही लढा सुरू केला होता. याचा परिणाम होऊन पाणथळी जागा,खारफुटी, कांदळवने वाचवण्यासाठी केंद्र, राज्यातील दोन्ही सरकारने हजाराहून अधिक जागा जतन व संरक्षणासाठी वनविभागाकडे सुपुर्द केल्या आहेत. यामुळे परिसरात हिरवळ वाढण्यास एकप्रकारे मदतच झाली असून यामुळे परिसरात वास्तव्यास येणाऱ्या स्थलांतरित पक्षांत मागील दोन वर्षात वाढ झाली असल्याचे पर्यावरणवादी संघटनांकडून सांगितले जात आहे.  मुंबईपासून सुरु होणाऱ्या एलिफंटा, मोरा, जेएनपीए,  रेवस, करंजा या सागरी प्रवासा दरम्यान समुद्रात रशिया, आस्टेलिया व इतर देशातुन स्थलांतरित सीगल पक्षी मोठ्या प्रमाणावर स्वैर विहार करताना दिसु लागले आहेत.

तर उरण परिसरातील पाणजे, डोंगरी, जसखार, सोनारी,जासई,नवीन शेवा,विविध खाडी किनारे आणि पाणथळी जागांवर विविध प्रकारच्या जातींचे आकर्षक जलचर पक्षी आणि स्थलांतरित फ्लेमिंगो पक्षी मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत. फ्लेमिंगो व इतर विविध जातींच्या जलचर पक्षांचा मुक्त संचार पक्षी प्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे.त्यामुळे पक्षीप्रेमीही मोठ्या प्रमाणात दिसणार्‍या पक्षांच्या विविध लिला पाहाण्याचा आनंद पर्यटक, प्रवासी, पक्षीप्रेमी घेऊ लागले आहेत.

टॅग्स :uran-acउरणbirds sanctuaryपक्षी अभयारण्यNavi Mumbaiनवी मुंबई