शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

खारघरमध्ये अग्निशमन दलाद्वारे मध्यरात्री मॉकड्रिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 22:51 IST

आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी रहिवाशांचेही योगदान

-वैभव गायकर

पनवेल : खारघर सेक्टर १९ मधील रिजेन्सी क्रेस्ट या रहिवासी संकुलात खारघर अग्निशमन दलाकडून शनिवारी मध्यरात्री मॉकड्रिल राबविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविता येतील, याकरिता अशाप्रकारचे रात्री राबविलेले हे मॉकड्रिल प्रथमच महाराष्ट्रात खारघरमध्ये राबविण्यात आले.

सिडकोचे मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्या उपस्थितीत मॉकड्रिल घेण्यात आले. शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास बिल्डिंगमधील मीटररूममध्ये आग लावण्यात आली. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवून बिल्डिंगमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी कारवाईला सुरुवात झाली. संबंधित बिल्डिंगमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, याबाबत चाचपणी करून अग्निशमनच्या जवानांची आगीवर नियंत्रण मिळविले.

मॉकड्रिल राबविताना पोलीस, अग्निशमनचे कर्मचारी, महानगर गॅस, महावितरण, रुग्णवाहिका आदीना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे सूचना विंग कमांडरने दिल्या होत्या. आग विझविताना प्रत्येक फ्लॅटमधून बाहेर काढलेल्या सदस्यांची गणती करण्याचे काम काही अग्निशमन दलातील कर्मचारी करीत होते. घटना घडल्यावर एका फोनवर घटनास्थळ गाठून अवघ्या ६ ते १३ मिनिटांत मॉकड्रिल यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या वेळी शैलेश पटेल, सुनील भाटिया, विशाल अग्रवाल, अरविंद प्रसाद, विष्णू पंचलगीया, जयेश गोगरी या रहिवाशांनी महत्त्वाचे योगदान दिले.

खारघर मधील रिजेन्सी क्रेस्ट सोसायटीमध्ये राबविण्यात आलेली नियोजित मॉकड्रिल यशस्वीरीत्या पार पडली. याकरिता रहिवाशांनी चांगले सहकार्य केले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली मॉकड्रिल महाराष्ट्रातील पहिलीच मॉकड्रिल आहे.- अरविंद मांडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, सिडको

आपत्कालीन परिस्थितीत काय करायला पाहिजे. याची माहिती मॉकड्रिलद्वारे मिळाली. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत सहजतेने सर्व परिस्थितीत हाताळत हे मॉकड्रिल यशस्वी केले. अशाप्रकारे रात्रीच्या मॉकड्रिल राबविण्यासाठी आमच्या सोसायटीची महाराष्ट्रातून निवड झाली, ही अभिमानाची बाब आहे.- शैलेश पटेल, अध्यक्ष, रिजेन्सी क्रेस्ट सोसायटी

टॅग्स :fireआगpanvelपनवेल