शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

तळोजातील औद्योगिक प्रदूषणाबद्दल ‘एमआयडीसी’ला पाच कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:58 IST

‘एनजीटी’चा आदेश : पैसे न भरल्यास अधिकाऱ्यांचे पगार बंद

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांकडून प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर सोडण्यामुळे झालेल्या पर्यावरणाच्या हानीची भरपाई करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाच कोटी रुपये द्यावेत, असा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) दिल्ली येथील प्रधान खंडपीठाने अलीकडेच दिला.

याआधी न्यायाधिकरणाने तेथील उद्योगांनाही अशाच प्रकारे भरपाईपोटी १० कोटी रुपये देण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले होते. त्यापैकी ४.१० कोटी रुपये जमा केले गेले. बाकीची ३.९० कोटी रुपये उद्योगांना गोळा करून ‘एमआयडीसी’कडे दिली, पण त्यांनी ती जमा केली नाही. त्यामुळे आधीची शिल्लक व आताचा दंड अशी मिळून एकूण ८.९० कोटीÞ ‘एमआयडीसी’ने ३० सप्टेंबरपर्यंत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहेत. याच अवधीत प्रदूषण पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासनही ‘एमआयडीसी’ने दिले आहे. या दोन्हीगोष्टींची पूर्तता महिनाअखेर न झाल्यास, ती होईपर्यंत ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पर्यावरण) आणि सदस्य सचिव यांचे पगार बंद केले जावेत, असा आदेशहीन्यायाधिकरणाने दिला.

तळोज्यातील हे औद्योगिक प्रदूषण, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका आणि हे सर्व थांबविण्याची जबाबदारी असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘एमआयडीसी’ यासारख्या संस्थांची घोर निष्क्रियता हा विषय अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी केलेल्या याचिकेच्या निमित्ताने गेले वर्षभर ‘एनजीटी’पुढे आहे व त्यात वेळोवेळी आदेशही दिले गेले. परंतु त्याचेही पालन न झाल्याने अध्यक्ष न्या. आदर्श कुमार गोयल व सदस्य न्या.एस. पी. वांगडी आणि डॉ. नगिन नंदा यांच्या खंडपीठाने हा ताजा आदेश दिला.

तळोजा औद्योगिक वसाहतीतील उद्योगांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सामायिक प्रक्रिया संयंत्र बसविलेले आहे व ते त्या उद्योगांच्या सहकारी संस्थेतर्फे चालविले जायचे. न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांचे पालन न होण्याने परिस्थिती सुधारत नाही, हे पाहून हे सामायिक प्रक्रिया संयंत्र चालविण्याची जबाबदारी नोव्हेंबर २०१८ पासून ‘एमआयडीसी’वर सोपवली. परंतु काहीच फरक पडला नाही. त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. विद्यासागर कानडे यांच्या अध्यक्षतेखाली निगराणी समिती नेमली गेली. समितीने दिलेला अहवाल आणि ‘एमआयडीसी’चा ‘स्टेटस रिपोर्ट’ याआधारे ताजा आदेश झाला. या सुनावणीत अर्जदार म्हात्रे यांच्यासाठी डॉ. सुधाकर आव्हाड, चेतन नागरे व अरविंद आव्हाड; प्रदूषण नियंत्रण मंडळासाठी मुकेश वर्मा तर ‘एमआयडीसी’साठी श्यामली गद्रे व रमणी तनेजा हे वकील काम पाहात आहेत.