शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातही विस्तारणार मेट्रोचे जाळे! ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोलीपर्यंत विस्तार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 10:51 IST

पहिल्या टप्प्याच्या यशानंतर सिडकोची चाचपणी

कमलाकर कांबळेनवी मुंबई : मागील ११ वर्षांपासून रखडलेला बेलापूर ते पेंधर हा ११ किमी अंतराचा मेट्रो मार्ग अखेर गेल्या महिन्यात प्रवासी सेवेसाठी खुला झाला आहे. अवघ्या पंधरा दिवसांत या सेवेला मिळालेला प्रतिसाद पाहून सिडकोचा हुरूप वाढला असून, पूर्वनियोजित उर्वरित तीन टप्प्यांसह नवी मुंबई महापालिका क्षेत्रातसुद्धा मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू केल्याची माहिती सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दळणवळणाच्या अद्ययावत सुविधांवर भर दिला आहे. त्यापैकी रस्ते वाहतुकीला सर्वोत्तम पर्याय म्हणून मेट्रो सेवेचा उल्लेख केला जात आहे.  सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी कार्यकाळात प्रकल्पाच्या कामाला गती देऊन हे काम, संचालनालयाची जबाबदारी महामेट्रोवर सोपविली. महामेट्रोने या मार्ग क्रमांक १चे काम पूर्ण करून गेल्या महिन्यात त्याचे लोकार्पण केले.

तज्ज्ञांची समितीही नेमली एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोच्या मार्ग क्रमांक ८चे काम प्रगतिपथावर आहे. हा मार्ग मेट्रो मार्ग क्रमांक ८ ए अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जाेडण्याकरिता सिडकोने प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समितीही नेमली आहे.

मेट्रोचा विस्तार ऐरोलीपर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोने दक्षिण नवी मुंबईसह उत्तर नवी मुंबई क्षेत्रात मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही क्षेत्रांना जोडण्यासाठी ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, घणसोली आणि नेरूळ या नोड्सपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.