शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचा प्रवास पुन्हा लांबणीवर, सिडकोने कसली कंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:31 IST

CIDCO : सिडकोने बेलापूर ते पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे मेट्रोचे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे.

नवी मुंबई : विविध कारणांमुळे नवी मुंबई मेट्रोची मागील दहा वर्षांपासून रखडपट्टी सुरू आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी यापूर्वी अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या, परंतु या सर्व डेडलाइन हुकल्याने नवी मुंबईकरांच्या मेट्रोचा प्रवास लांबणीवर पडला. कोविडच्या संसर्गामुळे हे संपूर्ण वर्ष वाया गेले. त्यामुळे मेट्रोचा पहिला टप्पा आता २0२१ मध्ये पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे.          सिडकोने बेलापूर ते पेन्धर, खांदेश्वर तळोजा, पेन्धर ते तळोजा आणि खांदेश्वर ते नवी मुंबई विमानतळ असे मेट्रोचे चार मार्ग नियोजित केले आहेत. याशिवाय हाच मेट्रो मार्ग पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंत जोडला जाणार आहे. यापैकी बेलापूर ते पेन्धर हा ११ किलोमीटर लांबीचा पहिलाच टप्पा दीर्घकाळापासून रखडला आहे. पहिल्या टप्प्यात ११ उन्नत स्थानके प्रस्तावित आहेत. त्यापैकी पहिल्या ६ मेट्रो स्थानकांचे काम अद्यापी अर्धवट अवस्थेत आहे, तर उर्वरित ५ मेट्रो स्थानकांची कामे प्रगतिपथावर आहेत. येत्या डिसेंबर, २०२० पर्यंत क्रमांक ७ ते ११ या पाच मेट्रो स्थानकांची कामे पूर्ण होतील, असा विश्वास सिडकोच्या संबिधत विभागाने वाटतो आहे. शेवटची पाच स्थानके पूर्ण झाली, तरी पहिली सहा स्थानके पूर्ण करण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर आहे. कारण जोपर्यंत सर्व स्थानके उभारून पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मेट्रोची केबलिंग, सिग्नलिंग, ऑपरेशन आणि सीस्टिमची कामे करता येणार नाहीत. या सर्व परिस्थितीची गंभीर दखल सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी घेतली असून, कोणत्याही परिस्थितीत २0२१मध्ये मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांना खुला करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे.

कंत्राटदाराला सिडकोची नोटीससिडकोने तीन वर्षांपूर्वी मे. प्रकाश कन्स्ट्रोवेल या कंपनीला पहिल्या सहा स्थानकांची उभारणी करण्याचे काम दिले होते, परंतु विविध कारणांमुळे या कंपनीला हे काम पूर्ण करता आले नाही. त्यामुळे कंपनीने २ जुलै, २0२0 रोजी सिडकोला नोटीस बजावून स्थानकांचे काम पूर्ण करण्यास आपण असमर्थ ठरत असून सदर कंत्राट रद्द करावे, असे कळविले होते. कंत्राटदाराने नोटिसीद्वारे उपस्थित केलेले सर्व मुद्दे खोडून काढत सिडकोने मे. प्रकाश कन्स्ट्रोवेल या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई