शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी-माथाडी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:15 IST

५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले. जवळपास  पाच तास मार्केटमधील  व्यवहार ठप्प झाले होते. बाजार समिती सभापतींनी  कामगार  व व्यापारी प्रतिनिधींची चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी समितीची नियुक्ती केल्यानंतर मार्केट पूर्ववत सुरू करण्यात आले. 

बाजार समितीमध्ये कोणत्याही गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये असा नियम  केंद्र शासनाने केला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही गोणींमध्ये ५० पेक्षा जास्त किलो माल भरला जात आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.  परंतु यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी एक दिवस बंदही केला होता. गुरुवारी तीन ठिकाणी जादा वजन आल्यामुळे कामगारांनी निदर्शनास आणून दिले. वारंवार या विषयावरून मतभेद होत असल्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी मार्केट बंदचे आवाहन केले. सकाळी दहा वाजता कांदा मार्केट बंद करण्यात आले.     व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये झालेल्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी सभापती अशोक डक यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी या नियमांची राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अंमलबजावणी व्हावी फक्त मुंबईमध्ये सक्ती करू नये अशी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांची अडवणूक होऊ नये अशी मागणीही केली. कामगार प्रतिनिधींनी आरोग्याच्या दृष्टीने गोणीचे वजन जास्त नसावे व नियमांचे पालन करावे अशी भूमिका मांडली. अखेर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली असून पुढील आठ दिवसात समितीने योग्य तोडगा काढावा, असे निश्चित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

कांदा-बटाटा मार्केटमध्ये निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी सभापतींनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत व्यापारी व कामगार प्रतिनिधींनी चर्चा करून समिती गठीत केली आहे. सदर समिती हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. - अशोक वाळुंज, संचालक कांदा-बटाटा मार्केट 

कृषिमालाची गोण ५० किलोपेक्षा जास्त वजनाची नसावी असा केंद्र शासनाचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त वजनाची गाेण नसावी  यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. - चंद्रकांत पाटील, माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती