शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती उद्यानात पालापाचोळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:47 IST

कळंबोलीमधील प्रकार; प्रदूषण पसरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

कळंबोली : उद्यानामधील पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदाराकडून येथील कचरा जाळून प्रदूषण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासून प्रदूषण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.उद्यानामधील पालापाचोळा जमा करण्याची जबाबदारी उद्यानाची देखभाल करीत असलेल्या ठेकादाराची आहे. यापासून खत तयार करता येते; पण ते न करता त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रकार होत आहे. कळंबोली सेक्टर २ ई येथील स्मृती उद्यानात गुरुवारी ५ वाजता ठेकेदाराच्या देखभाल करणाºया कामगारांकडून पालापाचोळ्याचे दहा ते पंधरा ढीग करून ते पेटवून दिले. त्यामुळे संपूर्ण उद्यान धुरात हरवले होते. त्याचबरोबर बाजूला असलेल्या एलआयजीतील रहिवाशांना त्याचा त्रास झाला. या कारणाने पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. विशेष म्हणजे, हा पालापाचोळा झाडांच्या खाली जाळण्यात आल्याने वृक्षांनाही हानी पोहोचली. या प्रकारांमुळे नियमांना छेद बसत असून, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न निर्माण होत आहे. उद्यानांची स्वच्छता, वृक्षांची छाटणी करताना वा अन्य वेळी मोठ्या प्रमाणावर झाडांचा पालापाचोळा पसरतो. मात्र, असा पालापाचोळा जमा करण्यासाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्थाच उपलब्ध करून दिलेली नाही. पालापाचोळा जमा करायचा कसा आणि कुठे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास बंदी घातली आहे; पण यांचा विसर सिडको देखभालीकरिता दिलेल्या ठेकादाराला याबाबत विसर पडला आहे. महिन्यातील दोन ते तीन वेळेस असा पालापाचोळा एकत्रित करून जाळला जात आहे. याकडे सिडको तसेच महापालिका आरोग्य विभाग लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.