शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या शेतकरी संपाचा स्मृतीदिन

By admin | Updated: October 27, 2016 03:21 IST

चरी कोपर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा २५ आॅक्टोबरला ८३ वा स्मृतीदिन. जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप. या

- नामदेव मोरे, नवी मुंबई चरी कोपर येथे शेतकऱ्यांनी केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचा २५ आॅक्टोबरला ८३ वा स्मृतीदिन. जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे सुरू असलेला शेतकऱ्यांचा हा एकमेव संप. या लढ्यामुळे खोती पद्धत बंद होवून हजारो कुळे सुरक्षित झाली. आठ दशकांनंतरही या लढ्याच्या स्मृती प्रकल्पग्रस्तांना लढण्याची प्रेरणा देत आहेत. सिडको, जेएनपीटी, सेझ, विमानतळ या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या भूमिपुत्रांनी शासनाशी व संबंधित यंत्रणांविरोधात उभारलेल्या लढ्यांमुळे नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे नाव देशभर गाजले. देशभरातील प्रकल्पग्रस्तांच्या लढ्यांना दिशा देण्याचे काम येथील आंदोलकांनी केले असून त्याची सुरवात स्वातंत्र्यपूर्व काळात चरी कोपरच्या लढाईने झाली. कोकणातील खोती पद्धतीला विरोध करण्यासाठी २७ आॅक्टोबर १९३३ रोजी चरी - कोपर गावी २५ गावांमधील शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित केला होता. कुळांनी जमीन कसायची व ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा ही अन्यायकारक पद्धत रद्द करण्यासाठी आंदोलनाचे रणशिंग फुकण्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता. शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत संपावर जावे असे आवाहन केले. शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी देश - विदेशात अनेक लढे दिले, आंदोलने केली होती पण संपावर जाण्याचा निर्णय जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच घेण्यात आला. शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या कुळांनी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे आंदोलन टिकूच शकत नाही. उपासमार सुरू झाली की आपोआप शेती कसण्यास सुरवात होईल असे सावकारांना वाटत होते. पण शेतकऱ्यांनी निर्धाराने लढण्यास सुरवात केली. मोलमजुरीची कामे करून अर्धपोटी राहून शेतकरी लढ्यात सहभागी झाले. अनेक कुटुंबांची ससेहोलपट झाली. पण सावकाराच्या दडपशाहीने मरण्यापेक्षा आंदोलन करून मरू असा निर्धार शेतकरी, त्यांचे कुटुंबीय व मुलांनीही केलेला. यामुळे अखेर १९३९ मध्ये संप मागे घेण्यात आला व पुढे त्याची दखल घेवून कूळ कायदा अस्तित्वात आला. चरी कोपरच्या लढ्यामुळे कसेल त्याची जमीन हे धोरण अमलात आले. कूळ कायदा तयार करण्यात आला. वर्षानुवर्षे गुलामगिरीसारखे राबणारी कुळे जमिनीची मालक झाली. या लढ्याला ८३ वर्षे होत असून आजही त्या आठवणी आगरी कोळी बांधवांना लढण्याची प्रेरणा देत आहेत. नवी मुंबईमध्ये सिडको व महापालिकेविरोधात गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी प्रकल्पग्रस्त तरूणाई नारायण नागू पाटील व दि. बा. पाटील यांचा आदर्श समोर ठेवून लढा देत आहेत. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई केल्यानंतर रस्त्यावर उतरलेली तरूणाई त्यांच्यावर अविश्वास ठराव आल्यानंतरही मुंढे हटाव मोहिमेमध्ये अग्रेसर होती. प्रकल्पग्रस्तांचा मुंढे हटाव मोहिमेमध्येही सहभागशहरातील प्रकल्पग्रस्त तरूणांनी आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून हक्कांसाठी लढा सुरू केला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई सुरू केल्यामुळे यापूर्वी नवी मुंबई बंद करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून मंदिरांवर कारवाई सुरू झाल्यानंतर व प्रकल्पग्रस्तांच्या घरांवरही कारवाई केली जाण्याच्या हालचाली सुरू झाल्या. आयुक्तांच्याविरोधात अविश्वास ठराव आल्यानंतर जनजागृती करण्यामध्येही प्रकल्पग्रस्तांचा मोठा वाटा होता. या तरूणाईसाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा इतिहास प्रेरणादायी ठरला. शेतकरी संपाच्या आंदोलनाची वैशिष्ट्ये २७ आॅक्टोबर १९३३ रोजी २५ गावातील शेतकऱ्यांनी संप पुकारला१९३४ - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलनस्थळी भेट दिली२५ आॅगस्ट १९३५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चरीला भेट दिली. तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनी चरीला भेट देवून चर्चा केली१९३९ मध्ये शेतकऱ्यांनी संप मागे घेतला. जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्षे चाललेला एकमेव संप