शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणीयोजनांमुळे गाजली कर्जतची सभा

By admin | Updated: April 1, 2017 23:47 IST

नगरपरिषद सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. सभेत कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना, मोहिनीकुंज इमारतीमधील

कर्जत : नगरपरिषद सर्वसाधारण सभा शुक्रवारी संपन्न झाली. सभेत कर्जत शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीयोजना, मोहिनीकुंज इमारतीमधील अनधिकृत बांधकाम आणि सार्वजनिक शौचालय साफसफाई आदी विषयांवर गाजली. या वेळी विकासकामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. काही कामाच्या निविदाच न आल्याने त्या पुन्हा काढण्याचे ठरविण्यात आले. नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा रजनी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गटनेते राजेश लाड, उपनगराध्यक्षा अर्चना बैलमारे, विरोधी पक्षनेत्या यमुताई विचारे, लालधारी पाल, उमेश गायकवाड, मिलिंद चिखलकर, शीतल लाड, अश्विनी दिघे, सई वारे, सोमनाथ ठोंबरे, नितीन सावंत, संतोष बैलमारे, अशोक ओसवाल, सुवर्णा जोशी, अरुणा वायकर, बिनीता घुमरे, मुकेश पाटील, अरविंद मोरे, मुख्याधिकारी दादाराव अटकोरे उपस्थित होते.शहरातील रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आल्यावर नगरसेविका सुवर्णा जोशी यांनी समाधान व्यक्त केले. शहरात काही ठिकाणी कमी दाबाने पाणी मिळत आहे, त्यामुळे झोनिंग करण्याबाबत चर्चा झाल्यावर मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी टेक्निकल अभियंत्याची गरज असून, जीवन प्राधिकरणाकडे मागणी केल्याचे सांगितले. पाणीचर्चेत सुवर्णा जोशी, नितीन सावंत, बिनीता घुमरे, राजेश लाड, लालधारी पाल, मिलिंद चिखलकर, सोमनाथ पालकर यांनी भाग घेतला. विषयपत्रिकेवर पाच नंबर विषयात २०१७-१८मधील विविध कामांसाठी वार्षिक ठेकेदाराची नेमणूक करावी, यावर नगरसेवक संतोष पाटील यांनी ठेकेदारांची नेमणूक का करता? असा प्रश्न उपस्थित करून मुद्रे गावात मोहिनीकुंज इमारतीमध्ये पाच गाळ्यांना मंजुरी असताना संबंधित ठेकेदाराने २२ ते २३ गाळे बांधले आहेत. याबाबत सर्वसाधारण सभेत विषय झाला, तरी नगरपरिषद प्रशासन यावर गप्प का बसले आहे? अनधिकृत गाळ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर स्थापत्य अभियंता नीलेश चौडीये यांनी पुनर्आराखडा तयार तयार केल्याचे सांगितले. इमारतीच्या चर्चेत संतोष पाटील, अरविंद मोरे, नितीन सावंत, बिनीता घुमरे यांनी भाग घेतला. मात्र, मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्यात शाब्दिक वाद झाले. नीलेश चौडीये यांनी एक महिन्यात त्यावर कारवाई करतो, असे सांगितल्याने वातावरण निवळले. नगरपरिषद कार्यालयाच्या समोरच्या इमारतीला पार्किंग नाही. त्याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे, तर त्या मोहिनीकुंजमधील रहिवाशांना नगरपरिषद प्रशासन काय न्याय देणार?असा प्रश्न अरविंद मोरे यांनी उपस्थित केला.नगरपरिषद क्षेत्रातील सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ केली जात नसल्याचा प्रश्न संतोष पाटील यांनी उपस्थित केला. दिवसातून चार वेळा स्वच्छता करण्याचे ठरवले असताना, ठेकेदाराचा माणूस दिवसातून एकदाच स्वच्छता करीत असल्याचे नितीन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बिलात कपात करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. खासदार श्रीरंग बारणे नदी संवर्धन फंडातून निधी देणार असून, दोन्ही निधीतून या ठिकाणी सुशोभिकरण, गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, जॉगिंग ट्रक आदी कामे आवश्यक असून तसे नियोजन करावे असे सांगून, तसेच शनी मंदिरच्या परिसरात उद्यान करण्याची मागणी केली. भिसेंगाव येथील सर्व्हे नंबर ५२ या जमिनीवरील आरक्षण बदलून रहिवासी विभागात करण्याबाबतचा विषय आल्यावर मुख्याधिकारी अटकोरे यांनी या जमिनीवरील हिल झोन उठवायच्या कामी सभागृहाचा ठराव आवश्यक आहे. त्यावर यमुताई विचारे यांनी हरकत घेतली. त्यावर नितीन सावंत, राजेश लाड, लालाधारी पाल, बिनीता घुमरे यांनी चर्चा केली. (वार्ताहर)