शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये बांधकाम तोडण्यास जोरदार विरोध

By admin | Updated: February 8, 2017 04:27 IST

हरित लवादाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश दिल्यानंतर माथेरानमधील भूमिपुत्रांची झोप उडाली आहे. या आदेशान्वये माथेरानमधील कारवाईला सुरवात झाली

अजय कदम, माथेरानहरित लवादाने अनधिकृत बांधकाम तोडण्याचा आदेश दिल्यानंतर माथेरानमधील भूमिपुत्रांची झोप उडाली आहे. या आदेशान्वये माथेरानमधील कारवाईला सुरवात झाली त्यामुळे माथेरानमधील वातावरण तापले होते. नगरपरिषदेच्या कारवाईच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केल्यामुळे माथेरानमध्ये तणावपूर्ण वातावरणाची स्थिती आहे. हरित लवादाने २००३ नंतरची बांधकामे त्वरित हटवून त्याचा अहवाल २२ फेब्रुवारीपर्यंत लवादास सादर करावा असे आदेश दिल्यामुळे नगरपरिषदेने कारवाई करण्यास सुरुवात केली. मंगळवारी सकाळपासून माथेरानकरांनी आपली दुकाने, हॉटेल्स, लॉज, घोडे, हातरिक्षा बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तसेच सकाळी ८ वाजल्यापासून एकत्र जमण्यास सुरु वात झाली. सर्व माथेरानकर माथेरानचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या राम चौकात येऊन पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची वाट पाहू लागले. त्याच वेळेस पोलिसांनी आपला मार्च काढून शक्तिप्रदर्शन केले. शेवटी १२.३० वाजता मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप येत असल्याचे स्थानिकांना समजले त्यामुळे सर्व स्थानिक घोषणा देत इंदिरा नगरच्या दिशेने निघाले. इंदिरा नगरच्या प्रवेशद्वारातच मुख्याधिकाऱ्यांची भेट झाली, परंतु मुख्याधिकाऱ्यांनी स्थानिकांची भेट नाकारली त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. शेवटी रिगल हॉटेल येथे पाच मिनिटे वेळ देऊन त्यांनी कारवाईला सुरु वात केली. त्यावेळेस पोलीस व स्थानिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मात्र पोलिसांच्या मवाळ भूमिकेमुळे वातावरण शांत होऊन कारवाईस सुरुवात झाली. स्थानिकांनी कारवाई थांबविण्यासाठी अधिकारी, पोलिसांकडे विनंती के ली, मात्र न्यायालयाच्या आदेशापुढे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.आम्ही सर्वसामान्य नागरिक, माथेरानमध्ये शेती करू शकत नाही. कंपन्या नाहीत त्यामुळे नोकरी सुद्धा करू शकत नाही. इथे येणाऱ्या पर्यटकांवर आमचा उदरनिर्वाह चालतो आहे. हात रिक्षा ओढून रक्ताचं पाणी करून आम्ही एक एक पैसा जमा करून घर बांधतो पण हे स्वत:ला पर्यावरणवादी समजणारे एसीत बसून लोकांना सतावत असतात. झाडे लावण्यास ही मंडळी येथे कधी येत नाहीत, ना झाडाची जोपासना करण्यास. पर्यावरणास आम्हीच जपतो मग हे पर्यावरणवादी आम्हास नाहक त्रास का देतात?- प्रकाश सुतार, सचिव, श्रमिक रिक्षा संघटना