शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये पावसाची अचूक नोंद शक्य

By admin | Updated: June 22, 2017 00:20 IST

एक दशकाहून अधिक काळ अडगळीत पडलेली हवामान खात्याची नोंद घेणारी यंत्रणा माथेरान नगरपरिषदेने बसविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : एक दशकाहून अधिक काळ अडगळीत पडलेली हवामान खात्याची नोंद घेणारी यंत्रणा माथेरान नगरपरिषदेने बसविली आहे. यामुळे माथेरानमध्ये पडणारा पाऊस, वाऱ्याचा वेग आणि तापमानाची अचूक नोंद घेणे आता शक्य होणार आहे. माथेरानमध्ये पावसाचे प्रमाण अधिक आहे. आतापर्यंत माथेरान येथील शार्लोट लेक या तलावा जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पारंपरिक पद्धतीने पावसाची नोंद घेतली जात असे आणि तीच जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येत होती. मात्र, आता माथेरान नगरपरिषदेने पाऊस आणि तापमानाची नोंद घेणारी आपली स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केल्याने यापुढे माथेरानच्या पावसाचे अचूक मोजमाप होणार आहे. माथेरान येथील सर्वात उंच ठिकाण असलेल्या पेमास्टर गार्डन येथे ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. याची जबाबदारी अन्सार महापुळे आणि विकास पार्टे या दोन कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. दिवसातून दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी पाऊस आणि तापमानाची नोंद घेऊन ती माहिती जिल्हा प्रशासनाबरोबर कुलाबा वेधशाळेकडे पाठविली जाते. भारतात आज अनेक संस्था हवामानाचे अंदाज वर्तवतात. तरीही आयएमडी म्हणजे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्याला आपण वेधशाळा म्हणतो, हीच सरकारने मान्यता दिलेली एकमेव वेधशाळा आहे. गेल्या १३७ वर्षांपासून आयएमडीने आपल्यावरचा हा विश्वास टिकवून ठेवला आहे. सातत्याने बदल घडवून, नवनवीन यंत्रणा आणून अद्ययावत राहण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नाही, तर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल आॅर्गनायझेशन म्हणून कायम सदस्यत्व असणारी आणि दक्षिण मध्य आशियायी राष्ट्रांच्या हवामानाची जबाबदारी असणारी संघटना म्हणून आयएमडीचे वर्चस्व आहे. याच संस्थेचे मार्गदर्शनातून ही यंत्रणा उभारण्यात आली आहे. या उपक्र मामुळे नावीन्यपूर्ण उपक्र म राबविण्याची परंपरा माथेरान नगरपरिषदेने कायम ठेवली आहे.दहा वर्षांपूर्वी माथेरान नगरपरिषदेने ही यंत्रणा खरेदी केली होती. अडगळीत पडलेली ही यंत्रणा उपयोगात आणून पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी, अभ्यासकांना माहितीचे दालन खुले केले आहे.