शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 17, 2025 12:31 IST

Navi Mumbai College Students Drown: मित्रांसोबतची पावसाळी सहल नवी मुंबईतील तिघांच्या जीवावर बेतली.

सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई: मित्रांसोबतची पावसाळी सहल तिघांच्या जीवावर बेतली. कोपरखैरणे परिसरातील १० मित्र माथेरानला गेले होते. या सहलीचा शेवट सुमित चव्हाण (१६), आर्यन खोब्रागडे (१९) व फिरोज शेख (१९) यांच्या आयुष्याच्या शेवटाने होईल, याची कल्पना कोणाला नव्हती. ही दुर्दैवी घटना रविवारी माथेरानच्या शार्लोट तलावात घडली. 

फिरोज हा घणसोली येथे तर सुमित व आर्यन कोपरखैरणे सेक्टर ५ मधील एकाच सोसायटीत राहत होते. त्याच परिसरातले १० जण माथेरानला सहलीला गेले होते. परतीचा प्रवास करताना पाय धुण्यास ते शार्लोट तलावाकडे गेले. तेथे एक जण डोहात पडला. त्याच्या मदतीला गेलेले पाच जण डोहात पडले. यातील दोघे बाहेर आले. सुमित, आर्यन व फिरोज हे बुडाले.

शिक्षणाची कास धरली; पण...फिरोज हा मॉडर्न कॉलेजमध्ये बीएमएस शिकत होता, तर आर्यन एक वर्षापासून पुण्यात वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सुटी असल्याने तो घरी आला होता. नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेल्या सुमितच्या वडिलांना अर्धांगवायू आहे. आई व मोठ्या भावावर कुटुंबाचा भार आहे. तिघांच्याही कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. परिवाराचा आधार बनण्यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरली होती. यातून ते भविष्यात यशाचे शिखर गाठून कुटुंबाचा उद्धार करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. 

टॅग्स :MatheranमाथेरानMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबईdrowningपाण्यात बुडणे