आगरदांडा : प्रत्येक विद्यार्थ्याने केवळ नावापुरते मातृभाषा न शिकता त्यावर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे. ज्या वेळी विद्यार्थी आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व मिळवतील तेव्हा विद्यार्थी मोठे अधिकारी बनतील. कुठल्याही स्पर्धेत शिक्षणाशिवाय पर्याय नाही. या जगात शिक्षणाला महत्त्व आहे, असे प्रतिपादन प्राचार्या शाहिदा रंगुनवाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना के ले.मुरुड वसंतराव नाईक महाविद्यालयात मातृभाषा दिन या कार्यक्र माचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या शाहिदा रंगुनवाला यांनी दीप प्रज्वलित करून केले. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी डॉ.सीमा ताहीद, डॉ.जनार्दन कांबळे, सुहेल खानजादा आदिंसह मान्यवर उपस्थित होते. मातृभाषा दिनाचे औचित्य साधून वसंतराव नाईक महाविद्यालयाचे उर्दू विभागाने जिल्हास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले. जिल्ह्यातून म्हसळा, महाड येथील महाविद्यालयांमधील ३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या निबंध स्पर्धेसाठी ऊफ ! यह महंगाई, रंग बदलती नोट, व्हॉटसअॅप! रहमत भी और जहमत भी, इलेक्ट्रॉनिक मीडिया और हम, उर्दू मे. इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच वक्तृत्व स्पर्धेकरिता उर्दू को रोजगार से जोडने के लिए क्या करे, नोटबंदी क्या मजाक है!(व्यंगात्मक) हे विषय देण्यात आले होते. वक्तृत्व स्पर्धेत म्हसळ्याची विद्यार्थिनी तैसीया फारु ख गोटेकर हिने प्रथम क्र मांक व व्दितीय क्र मांक म्हसळ्याची विद्यार्थी रु माना शेखने पटकावला तर तृतीय क्रमांक मुरु ड वसंतराव नाईक महाविद्यालयातील विद्यार्थी अनवर हलडे याने पटकावला. मुरु ड वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्राचार्या शाहिदा रंगुनवाला यांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. (वार्ताहर)
मातृभाषेवर प्रभुत्व मिळवावे
By admin | Updated: February 25, 2017 03:13 IST