शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

मसाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 01:45 IST

महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून २४ वर्षांत प्रथमच मुंबई बाजार समितीमधील अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली. प्रकल्पग्रस्त, गरीब, झोपडीधारक व छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई

- नामदेव मोरे,  नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून २४ वर्षांत प्रथमच मुंबई बाजार समितीमधील अतिक्रमणावर कारवाई सुरू झाली. प्रकल्पग्रस्त, गरीब, झोपडीधारक व छोट्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पालिकेने प्रथमच श्रीमंत व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटविले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांसह बाजार समिती अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून आयुक्त तुकाराम मुंढे शहरवासीयांच्या गळ्यातील ताईत बनू लागले आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता पोटमाळे व वाढीव एक मजल्याचे बांधकाम केले आहे. मसाला मार्केटमध्ये ६६० गाळे असून बहुतेक सर्वांनी अनधिकृ त बांधकाम केले आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने २००९ ते २०११ च्या दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांना एमआरटीपीअंतर्गत नोटिसा दिल्या होत्या. नोटीस देवून पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अतिक्रमणावर कारवाई झाली नव्हती. या मार्केटमध्ये सेस विभागाने अनेकवेळा दप्तर तपासणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केल्याने एकदाही दप्तर तपासणी पूर्ण करता आली नाही. व्यापाऱ्यांच्या दबावामुळे मार्केटमध्ये कधीच ठोस कारवाई केली जात नव्हती. शहरामध्ये प्रकल्पग्रस्त नागरिकांनी गरजेपोटी बांधलेली घरे, गरिबांच्या झोपड्या, मार्जिनल स्पेस व फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते. परंतु महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून एकदाही श्रीमंत व्यापारी व उद्योजकांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई झाली नव्हती. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासून अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. आयुक्तांनी कोणत्याही स्थितीमध्ये अतिक्रमण हटविण्याचा निर्धार व्यक्त केल्यामुळे मंगळवारी कारवाई करण्यात आली. पालिकेच्या कारवाईमुळे बाजार समितीमधील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देखभाल शाखेचे अभियंते व प्रशासनामधील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करून चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल, अशा प्रतिक्रिया मार्केटमधील इतर घटक व्यक्त करत आहेत. यामुळे अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहे. व्यापाऱ्यांनीही अतिक्रमण वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.खैरनार यांच्या कारवाईची आठवणबाजार समितीमध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू झाली. एपीएमसीमधील अनेक कामगार, वाहतूकदार व कर्मचाऱ्यांना गो. रा. खैरनार यांची आठवण झाली. खैरनार यांनी गरिबांच्या झोपड्यांपेक्षा श्रीमंतांच्या अतिक्रमणावर कारवाई केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या अतिक्रमणावरही कारवाई केली होती. नवी मुंबईमध्ये मुंढे यांनीही धनाढ्य व्यापाऱ्यांचे अतिक्रमण तोडण्याचे धाडस दाखविल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आहे. गुन्हे दाखल करण्याची मागणीबाजार समितीमध्ये देखभाल शाखा व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकाम झाले आहे. सिडको व पालिकेने यापूर्वी प्रकल्पग्रस्त नागरिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच धर्तीवर एपीएमसीमध्ये अतिक्रमण करणारे व त्यांना अभय देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे व त्यांच्यावर एमआरटीपीअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.