शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नैना’च्या विरोधातील मोर्चा चर्चेनंतर स्थगित; प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2023 15:18 IST

हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले. दरम्यान, राज्य सरकारने चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.

नवीन पनवेल : ‘नैना’ प्रकल्पाविरोधात पनवेलमधून शेतकऱ्यांचा पायी लाँग मार्च निघाला. यामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी ‘नैना हटाव, शेतकरी बचाव’, अशा घोषणा देण्यात आल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ नैना प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी आणि महाविकास आघाडीचे नेते एकत्र जमले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करून मोर्चा निघाला. हजारोंच्या संख्येने शेतकरी विधिमंडळाच्या दिशेने पायी लाँग मार्चमध्ये सहभागी झाले. दरम्यान, राज्य सरकारने चर्चा केल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.पनवेल, उरण परिसरात येऊ घातलेल्या नैना प्रकल्पाविरोधात आवाज उठविण्यासाठी शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाँग मार्च काढण्यात आला. पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते मुंबईतील आझाद मैदान, असा मोर्चा काढण्यात येणार होता. यामध्ये माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, शिवसेना नेते बबन पाटील, सभापती नारायण घरत, काँग्रेस नेते आर.सी. घरत, काँग्रेस नेते महेंद्र घरत, शिवसेना नेते शिरीष घरत, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कामगार नेते सुरेश ठाकूर, अन्य नेते, माजी नगरसेवक, शेतकरी, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सानपाड्यात मोर्चा स्थगित : ‘नैना’विरोधात काढण्यात आलेला मोर्चा दुपारी खारघरपर्यंत गेल्यानंतर शासनाकडून शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलविण्यात आले. तोपर्यंत मोर्चा सानपाड्यापर्यंत पोहोचला होता. ‘नैना’ शिष्टमंडळ मंत्रालयात गेले असताना रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात चर्चा झाली. त्यांनी दहा ते बारा दिवसांत सिडको, पालकमंत्री आणि ‘नैना’चे शिष्टमंडळ यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.

आमचा विरोध कायम : शिस्तबद्ध पद्धतीने शेतकरी, नागरिक, ग्रामस्थ या मार्चमध्ये सहभागी झाले. नैना प्रकल्प आम्हाला नकोच, आमच्या जमिनी फुकट घेणाऱ्या नैनाला आमचा विरोध आहे. ‘जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. या लाँग मार्चसाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईagitationआंदोलन