शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन बाजारीकरणावर आता राहणार अंकुश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:19 IST

संस्थांचा व्यावसायिक हेतू; नियमावली तयार करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय

नवी मुंबई : शहरात मॅरेथॉन स्पर्धांचे पेव फुटले आहे. अनेक संस्था व्यावसायिक हेतूने स्पर्धांचे आयोजन करत असून खेळाचे बाजारीकरण सुरू झाले आहे. चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी नियमावली तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पूर्ण मॅरेथॉनसाठी २ लाख, अर्धमॅरेथॉनसाठी १ लाख रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. स्पर्धा आयोजित करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणेही बंधनकारक असणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये काही वर्षांपासून मॅरेथॉन स्पर्धा, वॉकेथॉन व सायकल स्पर्धांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने केलेल्या पाहणीप्रमाणे आॅक्टोबर ते मार्च दरम्यान प्रत्येक रविवारी कुठे ना कुठे मॅरेथॉन स्पर्धा घेतली जात आहे. ५० टक्केपेक्षा जास्त स्पर्धा पामबीच रोडवर होत आहेत. ज्या रोडवर मॅरेथॉन स्पर्धा घेतली जाते त्या रोडवरील वाहतूक काही तास बंद करावी लागत आहे.स्पर्धा संपेपर्यंत वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते. अनेक स्पर्धांच्या आयोजनामागील उद्देश शंकास्पद असतो. सामाजिक संदेश देण्याच्या व खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा हेतू असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात स्पर्धेच्या आयोजनामधून मोठी आर्थिक उलाढाल होऊ लागली आहे. प्रायोजकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे वसूल केले जातात. स्पर्धेसाठी शहरात अनेक ठिकाणी विनापरवाना होर्डिंगबाजी केली जाते. महापालिकेच्या क्रीडा विभागाची व आवश्यक त्या परवानग्याही घेतल्या जात नाहीत. स्पर्धेची सुरवात ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी खड्डे खोदून व्यासपीठ तयार केले जाते. मोठ्या प्रमाणात शहर विद्रूप केल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.मॅरेथॉन स्पर्धा झाल्यानंतर रोडवर मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकल्या जात आहेत. कचऱ्याचे ढीग तयार होतात. आयोजक कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष करत आहेत. आयोजक महापालिकेच्या सुविधा वापरत आहेत, परंतु त्याचा काहीही लाभ महापालिकेस होत नाही. उलट आयोजकांनी नियमांचे पालन न केल्यामुळे त्यांनी केलेला कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांना उचलावा लागतो. याशिवाय सकाळी चार ते पाच तास पामबीचसारखा महत्त्वाचा रोड अडविला जात आहे. वाहनधारकांना व प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.मॅरेथॉन स्पर्धांचे बाजारीकरण थांबविण्याची मागणी दक्ष नागरिकांकडूनही होऊ लागली होती. महापालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून स्पर्धांच्या आयोजनासाठी नियमावली तयारी केली आहे. २० जूनला होणाºया सर्वसाधारण सभेमध्ये ही नियमावली मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.आयोजनासाठी प्रस्तावित नियमावलीस्पर्धांच्या आयोजनासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.विनापरवाना स्पर्धांचे आयोजन केल्यास संबंधित संस्थांवर कायदेशीर कारवाई केली जाणार.स्पर्धेचे आयोजन करताना कोठेही खड्डे खणता येणार नाहीत. विनापरवाना कोणत्याही प्रकारची जाहिरात करता येणार नाही.परवानगी घेऊन लावलेल्या जाहिराती व माहितीफलक तत्काळ काढून टाकण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.पोलीस व इतर शासकीय कार्यालयांची परवानगी घेण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.रोड व मोकळ्या जागेवर मंडप, स्टेज टाकायचे असल्यास त्यासाठी संबंधित विभाग अधिकाºयांची परवानगी घेणे बंधनकारक राहील.स्पर्धेच्या ठिकाणी व मार्गावर पडलेली पाण्याची बाटली, कप, प्लॅस्टिक किंवा इतर कचरा उचलण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.स्पर्धा संपल्यानंतर मार्गावर अस्वच्छता दिसल्यास संबंधितांची अनामत रक्कम जप्त करण्यात येणार.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन