शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घरांच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:28 IST

घरविक्रीच्या बहाण्याने २० जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

नवी मुंबई : घरविक्रीच्या बहाण्याने २० जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेलापूरच्या विकासक पितापुत्राविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी अनधिकृत इमारत उभारून त्यामधील घरांची विक्री करून कोट्यवधींचा अपहार केला आहे.बेलापूर येथील फणसपाडा परिसरात चार मजली अनधिकृत इमारत उभारून हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महंमद अब्बास काझी व रफिक महंमद काझी या विकासक पितापुत्रावर सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी २०१४ साली फणसपाडा परिसरात चार मजली इमारत उभारली होती. सदर इमारतीला पालिकेची परवानगी असल्याची बनावट कागदपत्रे दाखवून त्यांनी ग्राहकांना घरांची विक्री केली होती. त्यानुसार बेलापूर गावचेच रहिवासी शमशु कोतवडकर (५२) यांनीही त्यांच्याकडे घर खरेदीसाठी इच्छुकता दर्शवली होती. त्यानुसार कोतवडकर यांनी घरासाठी टप्प्याटप्प्याने रोख व धनादेशाद्वारे काझी पितापुत्रांना १२ लाख ७५ हजार रुपये दिले होते; परंतु २०१६ मध्ये सदर इमारत अनधिकृत असल्याने पालिकेने पाडली असता, आपली फसवणूक झाल्याचे कोतवडकर यांच्यासह इतर १९ ग्राहकांना समजले. या वेळी काझी पितापुत्रांनी दोन वर्षांत नवी इमारत उभारून घरे देतो, असे आश्वासन दिले. तोपर्यंत महिना आठ हजार रुपये भाड्याचा खर्चही देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतर काझी पितापुत्रांनी संपर्क टाळण्याने व भाड्यापोटी ठरलेली रक्कम देण्यासही नकार दिल्याने घरासाठी घेतलेली रक्कम परत मिळण्यासाठी ग्राहकांनी तगादा लावला होता. या वेळी कोतवडकर यांना महंमद काझीने भाड्याच्या रकमेचा दिलेला सहा लाखांचा धनादेशही बँकेत वटला नाही. यामुळे विकासक काझी पितापुत्रांकडून सातत्याने होत असलेल्या फसवणुकीविरोधात कोतवडकर यांच्यासह आसिफ मिरकर व जमीर काझी यांच्यासह इतरांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीNavi Mumbaiनवी मुंबई