शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
6
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
7
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
8
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
9
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
10
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
11
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
12
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
13
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
14
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
15
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
16
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
17
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
18
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
19
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!
20
हृदयद्रावक! एका पायलटच्या लग्नासाठी कुटुंबीय शोधत होते मुलगी तर दुसऱ्याला १ महिन्याचा मुलगा

उद्धट, उर्मट अपक्ष आमदार बालदी आणि गोगावले यांना आगामी निवडणूकीत शिवसैनिकच अस्मान दाखवतील - मनोहर भोईर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:22 IST

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्ताने उरणमध्ये गुरुवारी (१) विविध प्रकारच्या व्याधींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मधुकर ठाकूर -

उरण : शिवसेनेच्या मदतीवर राजकारणात आलेल्या उद्धट, उर्मट अपक्ष आमदार महेश बालदी आणि शिवसेनेशी गद्दारी करुन उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार भरत गोगावले या दोघांचा या निवडणुकीत पराभूत करून शिवसैनिक अस्मान दाखवतील, असा ठाम विश्वास रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण येथे व्यक्त केला आहे.

शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या वाढदिवसानिमित्ताने उरणमध्ये गुरुवारी (१) विविध प्रकारच्या व्याधींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उरण तालुका व उरण शहर शिवसेना शाखा यांच्या पुढाकाराने आणि शुश्रुषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या आयोजित मोफत शिबिरात ह्रदय तपासणी,ईसीजी,शुगर, रक्तदाब, आरबीएस, रक्त चाचणी, जनरल चेक अप, डोळ्यांची तपासणी, मोफत चष्मे वाटप, शुगर,बीपीची मोफत औषधे दिली जाणार आहेत.

या आयोजित शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मनोहर भोईर बोलत होते.शिवसेनेच्या बळावरच राजकारणात प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदार महेश बालदी यांनी उध्दट, उर्मटपणे शिवसेना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावरच टीका सुरू केली आहे.तर शिवसेनेचे ॠण विसरून शिवसेनेशी गद्दारी करणारे भरत गोगावले  शिवसेनेवर वाह्यात टीका करुन लागले आहेत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या उद्धट, उर्मट अपक्ष आमदार महेश बालदी आणि शिवसेनेशी गद्दारी करुन उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार भरत गोगावले या दोघांचा या निवडणुकीत पराभूत करून शिवसैनिक अस्मान दाखवतील असा ठाम विश्वास मनोहर भोईर यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला आहे. 

  याप्रसंगी जेएनपीए कामगार ट्र्स्टी तथा माजी जिल्हा प्रमुख दिनेश पाटील, शिवसेना उरण विधानसभा मतदार संघाचे प्रवक्ते महादेव घरत, जिल्हा महिला उपसंघटीका ममता पाटील,  उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर,उरण शहर संघटीका सुजाता गायकवाड,घारापुरी उपसरपंच बळीराम ठाकूर, तालुका अवजड वाहतूक संघटनेचे चेतन म्हात्रे,शहर संपर्क प्रमुख गणेश म्हात्रे,विभाग प्रमुख एस.के.पुरो,के.एल.कोळी, माजी नगरसेवक तुषार ठाकूर, निलेश भोईर, गायकवाड,माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे,शहर प्रमुख विनोद म्हात्रे, कैलास पाटील यांच्या शिवसैनिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNavi Mumbaiनवी मुंबई