शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

By नामदेव मोरे | Updated: April 14, 2023 06:18 IST

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे.

नवी मुंबई :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बदामी, लालबाग, तोतापुरी, गोळा आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. पुढील एक महिना  कोकणपेक्षा दक्षिणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मुंबई कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कोकणातून २६२९३ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमधून ४५०७० पेट्यांची आवक झाली आहे. कोकणातून ६०४ टन व दक्षिणेकडून ७८५ टन आंब्याची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरातून एप्रिल महिन्यात आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यातही अपेक्षित आवक होणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १६०० रुपये डझन दराने हापूस विकला जात आहे. 

आंब्यांचे दर (प्रति किलाे)बदामी    ८०लालबाग    ५०तोतापुरी    ४०गोळा     ४० किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपये किलो दराने आंबे उपलब्ध आहेत. कर्नाटकी हापूसला होलसेल मार्केटमध्ये ८० ते १५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १२५ ते २५० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी हापूसचे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे यापुढेही दक्षिणेकडील आंब्याचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. 

कोकणातून प्रतिदिन २५ ते ३० हजार पेट्यांची आवक सुरू आहे. पुढील एक महिना कोकणातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.  दक्षिणेकडील राज्यांमधून ४० ते ४५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

टॅग्स :Mangoआंबा