शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर

By नामदेव मोरे | Updated: May 8, 2024 20:07 IST

कोकणसह दक्षिणेतील आंब्याचाही समावेश

नवी मुंबई : अक्षयतृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७ हजार व इतर राज्यातून ५३ हजार पेट्यांची आवक झाली असून बाजारभावही नियंत्रणात आले आहेत.

आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्व असते. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होती व अक्षय तृतीयेला आवकचा विक्रम होत असतो. गत आठवड्यात आंब्याची आवक कमी झाली होती. पण दोन दिवसांपासून पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी १ लाख १३ हजार व बुधवारी १ लाख १ हजार पेटी आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७३०३ पेटी हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. दक्षीणेतील राज्यांमधून ५३८४२ पेटी आंबा विक्रीसाठी आला आहे.

बाजार समितीमध्ये हापूस ३०० ते ५०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते १ हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. कर्नाटकमधील आंब्याला प्रतीकिलो १०० ते ११० रुपये भाव मिळत आहे. कोकणच्या हापूसचा हंगाम अंतीम टप्यात आला असल्यामुळे आता इतर राज्यातील आंब्याची आवक वाढू लागली आहे. मे अखेरीस गुजरातचा आंबा येणारहापूसची आवक यापुढे कमी होईल. मे अखेरीस गुजरातचा आंबा दाखल होईल. जुनच्या पहिल्या टप्यात जुन्नरचा आंबाही मार्केटमध्ये विक्रिसाठी येईल. यानंतर उत्तरप्रदेश व इतर ठिकाणचा आंबाही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

अक्षयतृतीयेमुळे आंब्याची चांगली आवक होत आहे. हापूससह दक्षीणेकडील राज्यातूनही आंब्याची आवक होत आहे. बाजारभावही नियंत्रणात आहेत. मे अखेरीस गुजरात व जुनमध्ये जुन्नरच्या हापूसची आवक होईल. - बाळासाहेब बेंडे, व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMangoआंबा