शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 07:34 IST

सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. 

-नामदेव मोरेनवी मुंबई : महामुंबईकरांनी म्हणजेच मुंबई आणि परिसरातील भागातील नागरिकांनी यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत तब्बल १ लाख ३३ हजार टन आंबे फस्त केले आहेत. देशातील सात राज्यांमधून १५ प्रमुख प्रकारचे आंबे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीला येतात. यामध्ये सर्वाधिक पसंती कोकणच्या हापूसला मिळते. यावर्षी सर्वाधिक ४४ हजार टन आवक मे महिन्यात झाली होती.

सद्य:स्थितीमध्ये उत्तरप्रदेशमधील लंगडा, दशेरी व चौसाची आवक सुरू असून ऑगस्टपर्यंत आंबा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. मुंबई हीच आंब्याची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. फेब्रुवारी ते जुलै, ऑगस्टपर्यंत बाजार समितीवर फळांच्या राजाचे वर्चस्व राहते.  यावर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. एप्रिलपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत आवक जास्त झाली. मे व जूनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी झाली. गतवर्षी सहा महिन्यात १ लाख १४ हजार २७८ टन आंब्याची आवक झाली होती. 

यावर्षी १ लाख ३३ हजार १०० टन आंब्याची आवक झाली आहे. येथून मुंबई, नवी मुंबईसह जगभर आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. संपूर्ण हंगामामध्ये ७ राज्यांमधून १५ प्रमुख प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत असतो. यामध्ये ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते ती कोकणच्या हापूस आंब्याला. दक्षिणेकडील राज्यातील  हापूसशी साधर्म्य असलेला आंबा विक्रीसाठी येतो तोही अनेक विक्रेते कोकणच्या नावाने विकतात. हापूस व्यतिरिक्त पायरी, बदामी, केसर, जुन्नर हापूस, तोतापुरी, लालबाग, निलम, गोळा, मल्लिका, राजापुरी, लंगडा, दशेरी व चौसा हे आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असतात. सध्या उत्तरप्रदेशच्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. प्रतिदिन ८०० ते ९०० टन आवक होत आहे. ऑगस्टपर्यंत ग्राहकांना आंबा उपलब्ध होणार आहे. 

प्रशासनाचे नियोजनआंबा हंगामामध्ये प्रतिदिन ६०० वाहनांमधून आंबा विक्रीसाठी येतो समितीचे सचिव राजेश भुसारींच्या मार्गदर्शनाखाली उपसचिव संगीता अढांगळे यांनी  यंत्रणा पूर्ण कार्यान्वित ठेवली.

मुंबई बाजार समितीमध्ये कोकणच्या हापूससह देशभरातून आंबा विक्रीसाठी येत असतो. सद्यस्थितीमध्ये उत्तर प्रदेशमधील लंगडा, दशेरी, चौसाचा हंगाम सुरू असून, ऑगस्टपर्यंत आंबे उपलब्ध होणार आहेत. - संजय पानसरे, संचालक फळ मार्केट 

कोणत्या राज्यातून कोणता आंबा येतो ?महाराष्ट्र : हापूस, पायरी, केसर, जुन्नर हापूसकर्नाटक, आंध्र, तामीळनाडू, केरळ:  हापूस, पायरी, बदामी, केसर, तोतापुरी, लालबाग, निलम, गोळा, मल्लिकागुजरात : हापूस, पायरी, केसर, राजापुरी.उत्तरप्रदेश :  लंगडा, दशेरी, चौसा

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबई