शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

जुन्या भांडणातून एकावर कोयत्याने वार : पाठलाग करत केला हल्ला

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 10, 2023 17:37 IST

कोपर खैरणेतील घटना

नवी मुंबई : जुन्या भांडणातून एकाचा पाठलाग करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना कोपर खैरणेत घडली आहे. यावेळी तरुणाने हातावर वार झेलल्याने त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यातील नेमका वाद समोर आलेला नाही. 

कोपर खैरणे सेक्टर ४ येथे रविवारी रात्री हा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी राहणारा किरण वाशिवले (२८) हा रात्री ११ च्या सुमारास मित्रांसोबत उभा होता. यावेळी तिथे आलेल्या चौघांपैकी सचिन सपकाळ याने त्याच्याकडे जुन्या भांडणाचा विषय काढत त्या भांडणात तू होता का याबाबत चौकशी केली. यामध्ये त्यांच्यात वाद झाला असता सचिन त्याच्याकडील हेल्मेटने किरणला मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यानंतर राकेश धारी याने सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरवात करताच किरणने तिथून पळ काढला असता ते चौघेही त्याच्या मागे धावू लागले. काही अंतरावर किरणचा भाऊ भेटला असता तो त्यांच्याकडे चौकशी करत असतानाच सचिनने किरनवर कोयत्याने हल्ला केला. त्यामध्ये बचावासाठी किरणने कोयता हाताने अडवला असता त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

यानंतर चौघांनीही तिथून पळ काढला असता जखमी किरणला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी सोमवारी दुपारी कोपर खैरणे पोलिस ठाण्यात सचिन सपकाळ, नरेश सपकाळ, विशाल चिकणे व राकेश धारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपर खैरणेत मंडळाच्या आडून मुलांच्या टोळ्या तयार होत आहेत. त्यातूनच किरकोळ कारणातून एकमेकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी