शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक; ५० हजाराची खंडणीही मागितली

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 22, 2023 16:55 IST

आक्षेपार्ह्य व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी 

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीला व तिच्या कुटुंबियांना धमकावून ५० हजाराची मागणी करणाऱ्याला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. त्याने १३ वर्षीय मुलीसोबत स्नॅपचॅटवर ओळख वाढवून तिचे आक्षेपार्ह्य फोटो मिळवले होते. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो पैशाची मागणी करत होता. यासाठी तो नाशिकवरून पनवेलला येऊन गेला होता.

पनवेल परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. सदर मुलीची स्नॅपचॅटवर सिराज अहमद आबीद अली चौधरी (१९) याच्यासोबत ओळख झाली होती. यानंतर त्याने मुलीचा विश्वास संपादित करून तिचे आक्षेपार्ह्य फोटो, व्हिडीओ मिळवले होते. त्यानंतर तो तिला या फोटोच्या आधारे धमकावत होता. यासाठी तो पनवेलला येऊन तिला भेटून देखील गेला. यावेळी देखील त्याने तिच्यासोबत फोटो काढले होते. त्यानंतर त्याने सदर फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्या कुटुंबीयांकडे ५० हजाराची मागणी केली होती. यामुळे भयभीत झालेल्या पालकांनी पनवेल तालुका पोलिसांकडे तक्रार केली होती.

सदर तक्रारीनंतर गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक अनिल पाटील यांनी उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जगदीश शेलकर, सहायक निरीक्षक निलेश फुले, अविनाश पाळदे, अंबिकर अंधारे यांचे पथक केले होते. त्यांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने सिराजची माहिती मिळवून नाशिक गाठले. त्याठिकाणावरून सिराज याला अटक करण्यात आली असून तो गॅरेज कामगार आहे. त्याच्यावर बालकांच्या लैंगिक शोषणासह ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशाच प्रकारे त्याने इतरही कोणत्या मुलींना ब्लॅकमेल केले आहे का याचा तपास सुरु असल्याचे निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या हाती मोबाईल दिल्यानंतर त्याचा योग्य वापर होतोय का यावर पालकांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस