शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मालदीव राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात घुसखोरी; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 07:20 IST

वाहतूक थांबविल्याने पोलिसांना धक्काबुक्की

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यासाठी वाहतूक थांबवली असता, पोलिसांसोबत वाद घालत ताफ्यात दुचाकी घुसविण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना शिवीगाळ केली. याप्रकरणी त्या व्यक्तीविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुरुवारी सकाळी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलीह हे मुंबई येथून जेएनपीटीला चालले होते. सकाळी १०च्या सुमारास त्यांचा ताफा पामबीचमार्गे बेलापूरकडे जात असल्याने काही वेळासाठी करावे जंक्शन याठिकाणी पामबीचवर येणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. त्याचवेळी करावे येथे राहणाऱ्या राहुल धुळधुळे याने पामबीच मार्गावर दुचाकी घुसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्याला व्हीआयपी जात असल्याने थांबण्यास सांगितले असता, त्याने वाद घालून शिवीगाळ करत मार्गात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. अखेर बळाचा वापर करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांची ‘जेएनपीए’ला भेटमालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद यांनी गुरुवारी जेएनपीए बंदराला भेट दिली. दोन तासांच्या भेटीत त्यांनी बंदराच्या विकास, प्रगती आणि कामकाजाची पाहणी करून भविष्यात दोन देशांतील सागरी व्यापार वृद्धिंगत करण्याची ग्वाही दिली. मोहम्मद सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष वाघ, तसेच प्रशासनाचे सर्वच विभागांतील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.