शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘मलावी’चा आंबा मुंबईत, हिवाळ्यात चाखा चव; प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 06:40 IST

मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकिन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

नवी मुंबई - सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. 

नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा मलावी देशातील आंबा भारतामध्ये विक्रीसाठी येत असतो. ऐन हिवाळ्यात ग्राहकांना आंब्याची चव चाखता येते. मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकिन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एका बॉक्समध्ये आंब्याच्या आकाराप्रमाणे १०-२० नग आहेत. तीन किलो वजनाच्या या पेटीला ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला आहे.  बाजार समितीमधून मुंबई  क्रॉफर्ड मार्केट फळ बाजार, ब्रीचकँडी, घाटकोपर, माटुंगा, जूहू, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट व इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये हा आंबा विक्रीसाठी पाठविला आहे. 

कोकणातून १३ वर्षांपूर्वी नेली रोपेभौगोलिक वातावरणातही साधर्म्य आहे. मलावीमधील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातून हापूसची रोपे नेली होती. तेथे ४०० एकरमध्ये हापूसची बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आंबा विक्रीसाठी भारतामध्ये येत असून, त्यासोबत तेथील टॉकी अटकिन्स आंबाही विक्रीसाठी येतो. गतवर्षी जानेवारीपासून कोकणच्या हापूसची  नियमित आवक सुरू झाली होती. परंतु, यावर्षी कोकणचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. 

प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मलावीचा आंबा मार्केटमध्ये येतो. यावर्षी एक आठवडा उशिरा आवक सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे. - संजय पानसरे, संचालक, मुंबई बाजार समिती 

टॅग्स :Mangoआंबा