शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

निरोगी आरोग्यासाठी नियमित योग करा

By admin | Updated: June 22, 2017 00:25 IST

निरोगी आरोग्यासाठी नियमित योगाभ्यास अत्यंत उपयुक्त असून, त्यामुळे ताणतणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यास मोठी मदत होते

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : निरोगी आरोग्यासाठी नियमित योगाभ्यास अत्यंत उपयुक्त असून, त्यामुळे ताणतणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यास मोठी मदत होते, असे मार्गदर्शन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी बुधवारी येथे केले. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील चिंतामणराव केळकर विद्यालयात रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने योग दिनानिमित्त विशेष कार्यक्र माचे आयोजन केले होते, त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गीते बोलत होते.गीते म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा योग दिन संपूर्ण देशात साजरा करण्याचा निर्णय घेतला. म्हणून आजचा दिवस देशभरात योग दिन म्हणून साजरा केला जात असून, हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. योग विद्येला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळाली आहे. हा योग दिन साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील चिंतामणराव केळकर या विद्यालयाची निवड केली असे सांगून संपूर्ण जगात आज योगाचा स्वाथ्याकरिता योगाभ्यासाची कास धरली जात आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. ते सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. प्रत्येकाने योगा करणे अत्यंत गरजेचे आहे. योगाचा प्रचार आणि प्रसार जागतिक पातळीवर झाला आहे. जीवनात शिस्त ही अत्यंत महत्त्वाची असून, शिस्त आपले जीवन घडवते, असेही शेवटी गीते यांनी सांगितले. केळकर विद्यालयाच्या क्र ीडा शिक्षिका वैशाली भगत यांनी योगाचे प्रकार करून घेतले. योग दिनाचे आयोजन विद्यालयात केल्याबद्दल चिंतामणराव केळकर विद्यालयाचे चेअरमन अमर वार्डे यांनी आभार व्यक्त करून विद्यालयाची माहिती विषद केली. या वेळी रायगडचे प्रभारी जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र म्हात्रे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, आदींसह विद्यार्थी सहभागी झाले होते.नाईक महाविद्यालयात योगाभ्यासाचे धडेमुरु ड वसंतराव नाईक महाविद्यालयात भारतीय तटरक्षक व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर करून योग दिन साजरा करण्यात आला.या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शाहिदा रंगुनवाला, उपप्राचार्य डॉ.विश्वास चव्हाण, कमांडर अरुणकुमार सिंग, प्रधान अधिकारी एम.व्ही. परमार, योग प्रशिक्षक राजन मसाल, डॉ. देविदास रौंदळ, डॉ. मुरलीधर गायकवाड, डॉ. मधुकर वेदपाठक, डॉ. श्रीशैल बहिरगुंडे आदींसह तटरक्षक कर्मचारी, विद्यार्थी व आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. विश्वास चव्हाण म्हणाले की, २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने युनेस्कोच्या मान्यतेमुळे साजरा केला जातो. त्या निमित्ताने आपले शरीर निरोगी राहते. या दृष्टीने विचार केला तर आज तरी योगासारखा दुसरा पर्याय नाही. प्रत्येकाने दैनंदिन जीवनातील काही मिनिटे तरी योगशिक्षणाला व सरावाला द्यावीत आणि आपले पर्यायाने सर्वांचे आयुष्य निरामय करावे. या वेळी नियम, विविध प्रकारची आसने, प्राणायाम शिकवून त्यांचे महत्त्व व नियम या वेळी योग प्रशिक्षक राजन मसाल यांनी सांगितले. मुरु ड तालुक्यातील सर्व शाळेत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.संयुक्त राष्ट्र महासभेत मंजूर झालेल्या ठरावानुसार २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून ओळखला जातो. भारताच्यावतीने पंतप्रधान मोदींनी योग दिनाचा प्रस्ताव महासभेत मांडला होता. चीन, अमेरिके सह १९३ देशांच्या पाठिंब्यामुळे ११ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रस्ताव सहज मंजूर झाला.१पाष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजराच्म्हसळा : तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. च्तालुक्यातील केंद्रशाळा पाष्टी येथेही योग दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे, प्रकाश कोठावळे, मुख्याध्यापक संजय सूर्यवंशी, रोहण खडस आदींसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. च्योग दिनानिमित्त गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी योग व योग दिनाचे महत्त्व सांगून, प्रत्यक्ष योगाची प्रात्यक्षिके करून दाखविली. शरीर सुदृढ व निरोगी राहाण्यासाठी नियमित योगा करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून, अनेक दुर्धर रोगांपासून योगामुळे कायमची मुक्ती मिळू शकते, असेही गजानन साळुंखे यांनी सांगितले.२पाचशे विद्यार्थ्यांनी के ला योगच्रेवदंडा : येथील वि. म. पिळणकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात बुधवारी सुमारे पाचशे विद्यार्थ्यांनी जागतिक योग दिन साजरा केला. या कार्यक्र माला प्राचार्य रामदास पाडगे, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख प्रकाश पाटील व अन्य शिक्षकवृंद उपस्थित होता. च्प्रथम प्राध्यापिका अदिती देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी योगामुळे शरीर, मन, बुद्धी उत्तम राहते, असे सांगितले. हा कार्यक्र म राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत करण्यात आला. त्याचे प्रमुख किरण मठपती यांनी योगाची प्रात्यक्षिके दाखविली व विद्यार्थी वर्गाकडून करून घेतले. सूत्रसंचालन हर्षल म्हात्रे यांनी केले. ३नागोठणेत योगाचे प्रात्यक्षिकांसह धडे च्नागोठणे : येथील कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी शाळेच्या विद्यार्थी आणि सेवकवर्गाला योगशिक्षक नेताजी गायकवाड यांनी योगाचे प्रात्यक्षिकांसह धडे दिले. च्या वेळी शाळेच्या शिक्षिका सुजाता नांदगावकर यांनी योगदिनाचे महत्त्व आणि संकल्पना याबाबतची माहिती उपस्थितांसमोर स्पष्ट केली. मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड, पर्यवेक्षक के. जे. जांभळे, उल्हास ठाकूर, गारोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. ४पोलीस अधीक्षक कार्यालयात योग दिन च्अलिबाग : जागतिक योगदिनानिमित्त रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवारी सकाळी ७.१५ वाजता योगदिन साजरा करण्यात आला. पतंजली आणि भारत स्वाभिमानी ट्रस्टचे रायगड जिल्हा प्रभारी दिलीप घाटे यांनी योगासनाचे महत्त्व पटवून दिले. योग प्रशिक्षणाकरिता योग प्रशिक्षक डॉ. अश्विनी मेहता व अनघा मराठे यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना योगासनाची प्रात्यक्षिके करून दाखवली व ती सर्वांकडून करून घेतली. या वेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे, तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.