शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

उड्डाणपुलाखालील क्रीडा संकुलाचा उद्योजक महिंद्रा यांना ‘आनंद’; सोशल मीडियाद्वारे केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:23 IST

प्रत्येक शहराने नवी मुंबई पालिकेचे अनुकरण करण्याचे आवाहन

नवी मुंबई : स्वच्छता अभियानानिमित्ताने नवी मुंबई पालिकेने सानपाडा उड्डाणपुलाखालील कचरा साफ करून तेथे   क्रीडा संकुल तयार केले आहे. या क्रीडा संकुलाचे व्हिडीओ देशभर व्हायरल झाले आहेत. महापालिकेच्या या कल्पकतेची दखल उद्योजक आनंद महिंद्रा यांनीही घेतली असून, पुलाखालील क्रीडासंकुलाचा व्हिडीओ ट्वीट करून ‘चला प्रत्येक शहरात अशा प्रकारे परिवर्तन करू या’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. 

पुलाखालील कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने त्या ठिकाणी २,७४५ चौरस मीटर जागेवर क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला. जास्त उंची असलेल्या ठिकाणी बास्केटबॉल कोर्ट व बॅडमिंटनची ३ कोर्ट तयार करण्यात आली. २२ यार्डचे पीच असलेला बॉक्स क्रिकेटचा झोन तयार केला. ३०.६१ बाय १४ मीटर आकाराची स्केटिंग रिंग तयार करण्यात आली.  

एका तरुणाने या क्रीडा संकुलाचा व्हिडीओ तयार करून ‘तुमच्या शहरात  असे क्रीडा संकुल आहे का,’ असा प्रश्न उपस्थित केला . हाच व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करून प्रत्येक शहरात अशा प्रकारे परिवर्तन झाले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आणखी दोन पुलांखाली असेच क्रीडा संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सानपाडा पुलाखालील क्रीडा संकुलाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे व सीवूडमधील पुलाखालीही क्रीडा संकुल विकसित करण्यात येणार आहे.  - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका

स्वच्छता अभियानाअंतर्गत सानपाडा पुलाखाली क्रीडा संकुल तयार करण्यात आले आहे. या क्रीडा संकुलाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. शहर स्वच्छतेसाठी आवश्यक त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले जात आहे. - राजेश नार्वेकर, आयुक्त महानगरपालिका

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका