शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

महेश माणगावकरचा दबदबा

By admin | Updated: September 21, 2015 02:40 IST

भारताचा द्वितीय क्रमांकाचा खेळाडू आणि आशियाई सांघिक सुवर्णपदक विजेत्या मुंबईकर महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना

मुंबई : भारताचा द्वितीय क्रमांकाचा खेळाडू आणि आशियाई सांघिक सुवर्णपदक विजेत्या मुंबईकर महेश माणगावकरने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना ४०व्या महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी महिला गटात अव्वल मानांकित उर्वशी जोशीने अपेक्षित विजेतेपद उंचावले.बॉम्बे जिमखानाच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत महेशने सुरुवातीपासूनच राखलेला धडाका अंतिम सामन्यातही कायम राखला. त्याने या स्पर्धेत आपला आंतरराष्ट्रीय दर्जा सिद्ध करताना प्रत्येक खेळाडूला स्क्वॉशचे धडे दिले. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या चौथ्या मानांकित रवी दीक्षितने त्याला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. दोन वेळचा ज्युनिअर मलेशियन ओपनचा विजेता आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेचा पहिला भारतीय विजेता ठरलेल्या रवीकडून अटीतटीचा खेळ अपेक्षित होता. परंतु अनुभवामध्ये वरचढ ठरलेल्या महेशने आपला हिसका दाखवताना ११-८, ११-६, ११-२ अशी बाजी मारत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.दुसऱ्या बाजूला महिलांच्या गटात उर्वशीने द्वितीय मानांकित अ‍ॅना अवस्थीचे आव्हान परतावले. पहिल्या गेमपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम ठेवत उर्वशीने अ‍ॅनाचा सरळ तीन गेममध्ये ११-५, ११-७, ११-६ असा फडशा पाडला. व्यावसायिक गटामध्ये दिल्लीच्या परमजीत सिंगने बाजी मारीत तामिळनाडूच्या परथीबान अय्यपनला ११-९, ११-६, ८-११, ११-१ असा अनपेक्षित धक्का दिला. मुलांच्या १९ वर्षांखालील गटात तामिळनाडूच्या अग्रमानांकित अभय सिंगने अपेक्षित विजेतेपदाची नोंद करताना प्रणय जैनला ११-४, ११-२, १२-१४, ११-८ असे नमवले. तर मुलींच्या गटामध्येही अग्रमानांकित जुई कलगुटकरने आकांक्षा रावचा ११-२, ११-६, ११-४ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)