शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचं वर्चस्व 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 12:54 IST

एपीएमसी निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश

नवी मुंबई- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.  कोकण महसूल विभागातून शेकापचे राजेंद्र पाटील विजयी झाले आहेत. तर पुणे महसूल विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमधून माजी संचालक अशोक वाळुंज निवडून आले आहेत. त्यांनी राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. भाजी मार्केटमधून शंकर पिंगळे विजयी झाले असून त्यांनी त्यांनी के. डी. मोरे यांचा पराभव केला. मसाला मार्केटमधून मोठी संचालक किर्ती राणा पराभूत झाले असून तेथे विजय भुत्ता विजयी झाले आहेत. धान्य मार्केटमधून निलेश विरा विजयी झाले आहेत. कामगार मतदार संघातून शशिकांत शिंदे व फळ मार्केट मधून संजय पानसरे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे बाळासाहेब सोईस्कर आणि काँग्रेसचे  धनंजय वाडकर पुढे आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी ९२.५७ टक्के मतदान झालं होतं. एकूण ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झालं. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी हे मतदान घेण्यात आलं. या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीचा प्रयोग आला. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापनं पॅनल तयार केलं होतं. तर भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सहकार, कृषी क्षेत्रातील अनेकांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झालं होतं, तर व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झालं. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झालं होतं.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती