शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019 : सोशल मीडियावर इच्छुकांचा बोलबाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 02:55 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबई : ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही प्रमुख पक्षाने अद्यापि आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली नाहीत, त्यामुळे कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी भाजप आणि शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.बेलापूर विधानसभा क्षेत्रातून भाजपमधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अलीकडेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे पुढील एक-दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. असे असले तरी दोन्ही नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम तसेच फेसबुकवर या नेत्यांच्या प्रचाराचा सध्या मोठा बोलबाला पाहावयास मिळतो. बेलापूरमधून शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा हे इच्छुक आहेत, त्यानुसार त्यांनी मागील तीन वर्षांपासून मतदारसंघात विविध कार्यक्रमांचा धडाका सुरू केला आहे. विशेष म्हणजे, युतीबाबत अद्यापि निर्णय झालेला नाही. उमेदवारी भरण्याच्या अगदी शेवटच्या टप्प्यात युतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून संभ्रमात टाकणारी विधाने केली जात आहेत. तर रविवारी शिवसेनेने काही ठिकाणची उमेदवारी जाहीर करीत उमेदवारी फॉर्मचेही वाटप केले आहे.‘बेलापूर’वरून तर्क-वितर्कयुती झाल्यास बेलापूरची जागा भाजपकडेच राहणार हे निश्चित मानले जात आहे. नाहटा यांनी येथून जोरदार तयारी सुरू केल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाहटा यांच्या समर्थनार्थ सध्या आमचे ठरलेय आता अशा स्वरूपाच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेत बेलापूर नक्की कोणाच्या वाट्याला जाईल, याबाबत शहरवासीयांत तर्क-वितर्क सुरू आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Navi Mumbaiनवी मुंबई