शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘महानिवास’साठी ५३३ व्हीआयपींची नोंदणी; सीबीडी-बेलापुरात ३५० घरांची लवकरच सोडत

By कमलाकर कांबळे | Updated: August 13, 2024 10:50 IST

अर्जांच्या छाननीनंतर लवकरच सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

कमलाकर कांबळे, लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : विविध घटकांसाठी घरे बांधणाऱ्या सिडको महामंडळाने  खासदार, आमदारांसह भारतीय प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकारी, न्यायाधीशांसाठी सीबीडी-बेलापूर येथे प्रस्तावित केलेल्या महानिवास योजनेतील घरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ३५० घरांसाठी ५३३ जणांनी ऑनलाइन नोंदणी करून एक लाखाचे नोंदणी शुल्क भरले आहे. अर्जांच्या छाननीनंतर लवकरच सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सिडकोने गेल्या वर्षी पाम मार्गावर ३५० घरांचा महानिवास प्रकल्प प्रस्तावित केला. त्या अनुषंगाने पात्र ठरणाऱ्या इच्छुकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविले होते.

विशेष म्हणजे डिमांड रजिस्ट्रेशन स्कीमअंतर्गत ही योजना राबविली जाणार आहे. १ जानेवारी २०२० नंतर कार्यरत असलेले आमदार, खासदार यांच्यासह सर्वोच्च, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, महाराष्ट्रात सलग तीन वर्षे सेवा केलेले मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व खंडपीठांचे न्यायाधीश, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेले इतर राज्यांच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीश, आयएएस, आयपीएस, आयआरएस. आदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना या प्रकल्पात घर खरेदी करता येणार आहे.

आराखडा अंतिम टप्प्यात

  • प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी या क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या आर्किटेक्ट कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. 
  • या प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित सल्लागार संस्थेने कामालाही सुरुवात केली आहे. 
  • प्रकल्पाच्या मास्टर प्लानचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्राथमिक प्रकल्प अहवाल, अंदाजित खर्च, वास्तुशास्त्रानुसार अभियांत्रिकी आराखडा आणि डिझाइन आदी कामांना वेग आला आहे.

योजनेचे वैशिष्ट्य

  • पामबीच मार्गावरील सीबीडी-बेलापूर सेक्टर १५ ए येथील भूखंड क्रमांक २० वर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. येथे ३ बीएचके १५०, ४ बीएचकेच्या २०० अशा एकूण साडेतीनशे सदनिका आहेत. यांची अंदाजित किंमत अनुक्रमे २ कोटी ४५ लाख आणि ३ कोटी ४७ लाख आहे.
  • दिलेल्या मुदतीत अनेकांना घरासाठी नोंदणी करता आली नव्हती. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी आणि शुल्क भरण्यासाठी ८ ते २२ जुलैदरम्यान अतिरिक्त मुदत दिली होती. या कालावधीत ७० जणांनी नोंदणी करून शुल्क अदा केले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपर्यंत या प्रकल्पातील घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ५३३ झाली. 
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको