शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील महामुंबई प्रकल्प गुंडाळला? राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:46 IST

MahaMumbai project : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता. परंतु, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आता हा प्रकल्प गुंडाळला आहे. या जागेवर राज्य सरकार विशेष प्रकल्प आणण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्राने दिली.दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात तिसऱ्या मुंबईची घोषणा केली होती. अलिबाग, रोहा, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी १९,१४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती. त्यानुसार सिडकोने कंबर कसली होती. भूसंपादनाच्या कामासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच जमिनीच्या सर्वेसाठी मेट्रो सेंटरबरोबर करारही केला होता. त्याचे शुल्कसुध्दा मेट्रो सेंटरला अदा केले होते. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे सिडकोने योजिले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महामुंबईचा प्रकल्प स्थगित करण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. महामुंबईच्या प्रस्तावित जागेवर विशेष प्रकल्प आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांतील १८,८४२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर अर्थात नैनाच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. नैना क्षेत्रात ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालापूर व पनवेल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. परंतु, आठ वर्षे उलटले तरी सिडकोला नैना क्षेत्राचा विकास करता आलेला नाही. यातच राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांत महामुंबई या तिसऱ्या शहराची घोषणा केली. नवी मुंबईपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या या नव्या शहराची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने तयारीही सुरू केली. मात्र, राज्य सरकारने गेल्या आठवड्यात महामुंबई प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार सिडकोनेसुध्दा भूसंपादनाची प्रस्तावित प्रक्रिया गुंडाळल्याचे समजते. परिसरातील जमिनीचे भाव वधारले महामुंबईच्या घोषणेमुळे चार तालुक्यांसह परिसरातील जमिनीचे दर वधारले. जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहार तेजीत आले. अनेक गुंतवणूकदारांनी अव्वाच्या सव्वा दराने या परिसरात जमिनी खरेदी केल्या. परंतु आता हा प्रकल्पच रद्द केल्याने गुंतवणूकदार, विकासक व स्थानिक भूधारकांची निराशा झाली आहे..

टॅग्स :Raigadरायगडcidcoसिडको