शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांच्या अधिकारांवर गदा

By admin | Updated: March 3, 2016 02:49 IST

स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपालिकांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ लाख ३१

नामदेव मोरे, नवी मुंबईस्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपालिकांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ लाख ३१ हजार शौचालये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आॅक्टोबर २०१९ पर्यंत चालणाऱ्या या अभियानाचा प्रत्येक महिन्याचा अहवाल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडणे आवश्यक आहे. परंतु नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरवासीयांपासून व सर्वपक्षीय नगरसेवकांपासून ही माहिती लपविली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या अभियानाच्या अंमलबजावणीविषयी शंका उपस्थित होत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जवळपास वर्षभरापासून शहरात स्वच्छता अभियान सुरू केले आहे. स्वच्छ भारत व स्वच्छ नवी मुंबईचे होर्डिंग शहरातील प्रत्येक चौकात लावण्यात आले आहेत. परंतु याच अभियानाचा भाग असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची माहिती मात्र पालिका प्रशासनाने सर्वांपासून लपवून ठेवली आहे. राज्यामधील २६ महानगरपालिका व २६५ नगरपालिकांमध्ये एकूण ५ कोटी ८ लाख २७ हजार ५३१ नागरिक वास्तव्य करत आहेत. शहरांमधील कुटुंबांची संख्या १ कोटी ८ लाख १३ हजार ९२८ एवढी आहे. यामधील २९ टक्के म्हणजेच ३१ लाख ३६ हजार ३० कुटुंबीयांकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. २२ लाख ८९ हजार नागरिक सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असून तब्बल ८ लाख ४६ हजार कुटुंबातील सदस्य उघड्यावर शौचास जात आहेत. प्रत्येकाला शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये २ लाख ५७ हजार ६०१ सदनिका आहेत. यामधील २ लाख ३३९ घरांमध्ये वैयक्तिक प्रसाधनगृह आहे. ५७,२६२ घरांमध्ये वैयक्तिक शौचालय नाही. यामधील ५१ हजार ४८८ घरांमधील सदस्य सार्वजनिक प्रसाधनगृहांचा वापर करत आहेत. उरलेल्या ५७४४ कुटुंबामधील जवळपास २६ हजार नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. यामधील ज्यांना शक्य असेल त्यांच्या घरामध्ये प्रसाधनगृह बांधून देणे, जिथे शक्य नाही तिथे फिरते शौचालय उपलब्ध करून देणे, जागा उपलब्ध असेल तर सार्वजनिक शौचालय बांधून देण्याचे काम स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत सुरू आहे. नागरिकांनी श्रमदानामधून आठवड्यातून किमान एक वेळ शहरात स्वच्छता मोहीम राबविणेही अभिप्रेत आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये त्याविषयीचा अहवाल मांडणे बंधनकारक आहे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने हागणदारीमुक्त शहर अभियान सुरू केले आहे. प्रत्येक प्रभागामध्ये श्रमदानाने स्वच्छता अभियानही सुरू केले आहे. मोडकळीस आलेल्या प्रसाधनगृहांची दुरुस्ती सुरू झाली आहे. नवीन प्रसाधनगृह बांधण्याच्या योजनाही तयार केल्या जात आहेत. परंतु या सर्व कामांची माहिती सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आलेली नाही. प्रशासनाने सत्ताधारी राष्ट्रवादीसह विरोधी पक्षातील सदस्यांनाही अंधारात ठेवले आहे. नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात ?स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्याविषयी राज्य शासनाचे अव्वर सचिव सुधाकर बोबडे यांनी १९ नोव्हेंबर २०१५ मध्ये परिपत्रक काढले आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये विषयपत्रिकेमध्ये केलेल्या कामाचा तपशील देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु यानंतरही महापालिका प्रशासनाने स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्याविषयी वर्षभरामध्ये काय केले, अभियान राबविले जाते की नाही याविषयी कोणतीच माहिती सभागृहापुढे ठेवलेली नाही. यामुळे महापालिका लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासनच चालवत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नगरसेवकांच्या व सर्वसाधारण सभेच्या अधिकारांवरच गदा आणली आहे.नवी मुंबईला १ कोटी ४८ लाख निधीस्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी राज्य व केंद्र शासन जवळपास ८० कोटी रूपये खर्च करत आहे. यामधील नवी मुंबई महानगरपालिकेला शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाकडून ८० लाख ५७ हजार व राज्य शासनाकडून ६७ लाख ७७ हजार रूपये असे एकूण १ कोटी ४८ लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी दोन वेळा संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचा पहिला क्रमांक मिळविणाऱ्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाने याविषयी सर्वांनाच अंधारात ठेवले आहे.