शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडको लॉटरीला रिस्पॉन्स कमी; पसंतीच्या घरासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 08:15 IST

सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या २६ हजार घरांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ११ डिसेंबर रोजी अर्जनोंदणीची मुदत संपली. या काळात एक लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी अर्जनोंदणी केली आहे. अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता यावा, या दृष्टीने सिडकोने ही मुदत २६ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. 

सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरे बांधली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना ‘महारेरा’ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यांतील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अखेरची मुदत ११ नोव्हेंबरपर्यंत होती; परंतु निवडणुकीच्या धामधुमीमुळे अनेकांना इच्छा असूनही ऑनलाइन अर्जनोंदणी करता आली नाही. 

१ लाख १० हजार ग्राहकांची नोंदणीnघरांच्या किमती जाहीर न केल्याने इच्छुक ग्राहक संभ्रमात आहेत. त्यामुळे अनेकांनी इच्छा असूनही ऑनलाइन अर्ज केलेला नाही. परिणामी अर्जनोंदणीचा अपेक्षित आकडा सिडकोला गाठता आलेला नाही. nया योजनेंतर्गत १ लाख १० हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे, तर ३७ हजार ५०० अर्जदारांनी शुल्क भरले.  

टॅग्स :cidcoसिडको