शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

प्रेमीयुगलांचा धुडगूस

By admin | Updated: December 25, 2016 04:41 IST

शहरातील उद्याने व इतर काही सार्वजनिक ठिकाणांवर प्रेमीयुगलांनी धुडगूस घातला आहे. त्यांच्या अश्लील चाळ्यांमुळे सामान्य नागरिकांची कुचंबणा होत आहे.

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई शहरातील उद्याने व इतर काही सार्वजनिक ठिकाणांवर प्रेमीयुगलांनी धुडगूस घातला आहे. त्यांच्या अश्लील चाळ्यांमुळे सामान्य नागरिकांची कुचंबणा होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अनिर्बंध व स्वैर वर्तणुकीला कोणाचाही लगाम नसल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्यानांसह विरंगुळ्याच्या सार्वजनिक ठिकाणी इतरांना लज्जास्पद वाटेल, असे कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगलांवर कारवाईची मागणी नागरिकांडून होत आहे.नागरिकांच्या विरंगुळ्याच्या ठिकाणांवर प्रेमीयुगलांनी ताबा मिळवला आहे. अनेक उद्याने दुरुस्तीअभावी ओस पडली असून, त्यापैकी काही ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवे बंद असतात. याचा पुरेपूर फायदा सर्वच वयोगटातील प्रेमीयुगलांकडून घेतला जात आहे. त्यामुळे विरंगुळ्यासाठी बनवलेली उद्याने अश्लील चाळे करण्याची ठिकाणे बनली आहेत. शहरात विरंगुळ्याच्या ठरावीकच जागाआहेत. यात प्रामुख्याने वाशी विभागातील मिनी चौपाटी, सागर विहार, तसेच पामबीच मार्गावरील नेरूळ तलाव, सीबीडीतील सरोवर विहार आदींचा समावेश आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी महापालिकेने विकसित केलेल्या उद्यानांच्या जागा आहेत. या बहुतांशी ठिकाणी प्रेमीयुगलांचा मुक्त वावर दिसून येतो. मिनी चौपाटी आणि सागर विहार परिसरात, तर सकाळी १० वाजल्यापासून प्रेमीयुगलांचा वावर सुरू होतो. या परिसरातील घनदाट झाडीचा आडोसा घेऊन ही जोडपी एकमेकांना बिलगून तासनतास येथे बसून असल्याचे दिसून येते. पामबीच मार्गावरील नेरूळ तलाव आणि सीबीडीच्या सरोवर विहार परिसरातही हेच चित्र पाहवयास मिळते. अखंड प्रेमात बुडालेल्या या प्रेमीयुगलांचे चोरून चाळे पाहणाऱ्या अंबटशौकिनांचाही येथे नियमित वावर असतो. ही परिस्थिती गुन्हेगारी घटनेला अप्रत्यक्षरीत्या प्रोत्साहन देणारी असल्याने अशा प्रेमीयुगलांना रोख लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सैराट तरुणाईला आवर घालाउद्यान व सार्वजनिक ठिकाणी अश्लील व लज्जास्पद चाळे करणाऱ्यांत महाविद्यालयीन तरुणाईबरोबरच शाळेतील अल्पवयीन मुलांचे व मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. अनेकदा शाळेच्या युनिफार्मवर पाठीला दप्तर लटकावून ही मुले उद्यानाच्या एखाद्या कोपऱ्यात तासनतास बसून असतात. सिनेमा, टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आदी प्रसारमाध्यमांमुळे सैराट झालेल्या या तरुणाईला आवर घालण्याची प्राथमिक जबाबदारी त्यांच्या पालकांची असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.खारघरमधील ड्रायव्हिंग रेंजला पसंतीखारघर येथील गोल्फ कोर्सजवळ असलेल्या ड्रायव्हिंग रेंज या स्थळाला प्रेमीयुगलांची अधिक पसंती आहे. या परिसरात सकाळपासूनच जोडप्यांची रेलचेल पाहावयास मिळते. त्याचप्रमाणे या परिसरातील खारघर हीलवरही तरुणाईचा वावर दिसून येतो. खारघरच्या स्कायवॉकवर टप्प्याटप्प्यांवर जोडप्यांचा तळ दिसून येतो. जोडप्यांचा वावर असणारी प्रमुख ठिकाणेवाशीतील मिनी चौपाटी व सागर विहारचा परिसरखारघर सेंट्रल पार्कपामबीच मार्गावरील नेरूळ तलावसीबीडीतील मॅन्गो गार्डन, पारसिक हील टेकडी ऐरोली येथील गवळी देव धबधबाशहरातील दुर्लक्षित उद्याने, पडिक इमारती व रेल्वे स्थानकांचा परिसर