शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई बाजार समितीत कांदा सडल्याने नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:51 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. मागणीपेक्षा जास्त माल विक्रीसाठी येत असल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. विक्री न झालेला माल सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.बाजार समितीमध्ये मंगळवारी ६५ ट्रक व ६७ टेंपोमधून तब्बल १३८६ टन कांदा विक्रीसाठी आला आहे. सोमवारीही ११३६ टन आवक झाली होती. एक आठवड्यापासून मार्केटमध्ये आवक वाढली असल्यामुळे बाजारभाव प्रचंड घसरू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये जुन्या कांद्याला फक्त ४ ते ८ रुपये व नवीन कांदा १० ते १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. एप्रिल व मेमध्ये कांद्याला १० ते १२ रुपये दर मिळत होता. दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल या अपेक्षेने व जादा पीक असलेल्या शेतकºयांनी कांदा चाळींमध्ये साठवला होता. परंतु बाजारभाव पडल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.मुंबई बाजार समितीमध्ये लिलावगृहासह सर्व गाळ्यांमध्ये विक्री न झालेल्या कांद्याची साठवणूक करून ठेवण्यात आली आहे. यामधील बहुतांश माल सडू लागला आहे. लिलावगृहामध्ये मंगळवारी १०० पेक्षा जास्त गोणी सडल्या असून तो माल फेकून द्यावा लागला आहे. विक्रीसाठी पाठविलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक अचानक वाढली असल्यामुळे बाजारभाव घसरले असल्याची प्रतिक्रिया व्यापाºयांनी दिली असून पुढील काही दिवस अशीच स्थिती राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.>बटाटा दर घसरलेमार्केटमध्ये ६५ ट्रक व१३ टेम्पोंमधून तब्बल १४२० टन बटाटा विक्रीसाठी आला आहे.उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधून माल विक्रीसाठी आला आहे. ६ ते १७ रुपये किलो दराने होलसेल मार्केटमध्ये विक्री होऊ लागली आहे. बटाट्याचीही विक्री न झाल्यामुळे माल खराब होऊ लागला आहे.