शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या निर्यात शुल्कामुळे कोट्यवधींचे नुकसान! २५ कंटेनर कार्गोधील ८०० टन कांदा सडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 19:18 IST

सुमारे २०० कंटेनर कार्गो देश, राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी पाठविण्यात आले होते.

मधुकर ठाकूर

उरण : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयानंतर शुल्क भरण्याची तयारी नसल्याने, परतीचे मार्ग बंद झाल्याने आणि शुल्क मागे घेण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही . यामुळे जेएनपीए बंदर आणि परिसरात निर्यातीसाठी २५ कार्गो कंटेनरमधुन आलेला ८०० टन कांदा सडला असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली.

  केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयाअगोदरच जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्डमध्ये सुमारे २०० कंटेनर कार्गो देश, राज्यातील विविध भागातून निर्यातीसाठी पाठविण्यात आले होते.

मात्र ४० टक्के शुल्क भरण्यास अनेक निर्यातदारांनी नकार दिल्याने कस्टम विभागाने कांद्याचे कार्गो कंटेनर होल्ड केले होते.कस्टम विभागाने  नाशिवंत कांद्याचे मलेशिया, श्रीलंका, दुबई आदी देशात पाठविण्यात येणारे २०० कार्गो कंटेनर होल्ड केल्याने सुमारे चार हजार टन कांदा सडण्याच्या तयारीत होता.यामुळे व्यापारी, शेतकरी,निर्यातदार हवालदिल झाले होते.

 जेएनपीए बंदरात आणि बंदरा बाहेरील विविध कंटेनर यार्डमध्ये निर्यातीसाठी पडून असलेला कांदा सडून होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी ४० टक्के शुल्क भरुन कांद्याचे कंटेनर कार्गो निर्यात केले आहेत.तर काही व्यापाऱ्यांनी नुकसान टाळण्यासाठी निर्यातीऐवजी कांदा स्थानिक बाजारात माघारी विक्रीसाठी पाठवुन दिला आहे .

  मात्र शुल्क भरण्याची तयारी नसल्याने, परतीचे मार्ग बंद झाल्याने आणि शुल्क मागे घेण्याच्या निर्णयावर केंद्र सरकारने कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याने जेएनपीए बंदर आणि परिसरात निर्यातीसाठी २५ कार्गो कंटेनरमधुन आलेला ८०० टन कांदा सडला असल्याची माहिती स्वान ओव्हरहेड या निर्यात कंपनीचे मालक राहुल पवार यांनी दिली. तर केंद्र सरकार कांद्यावरील ४० टक्के शुल्क आकारणी  कमी करण्याची शक्यता आता धूसर होत चालली आहे.  शुल्क भरुन कांद्याची निर्यात हळूहळू करु लागले आहेत.कांद्याची आवक वाढली तर शुल्क कमी होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया होल्टीकल्चर प्रोडक्ट एक्सपोर्टर असोशिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी व्यक्त केला आहे.