शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट - वसतिगृहात नवीन गृहपालांची नियुक्ती, विद्यार्थ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:45 IST

गोंधळपाड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून चोवीस तासांत कारवाई

अलिबाग : तालुक्यातील गोंधळपाडा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात महिला गृहपालांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. याबाबत जिल्हाधिकाºयांनी त्वरित कारवाई केली आहे. महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून त्यांच्या जागी समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन केली होती. शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच रायगड जिल्हा समाज कल्याण कार्यालयात एकच धावपळ उडाली होती तर सहायक समाज कल्याण आयुक्त रविकिरण पाटील सकाळीच वसतिगृहात पोहोचले.

महिला गृहपाल एम. जे. नरहरे गेल्या चार वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र, मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे आणि मुलांच्यारूममध्ये जाऊन त्यांना मारहाण करणे, मुलांना वसतिगृहातून काढून टाकणे आदी प्रकारे सातत्याने मुलांना त्रास देत होत्या. वसतिगृहातील मुलांनी याबाबत समाज कल्याण अधिकाºयांना भेटून अनेक निवेदने दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही गेल्या चार वर्षांत झाली नव्हती. अलीकडे महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून मुलांना त्रास अधिक प्रमाणात वाढल्याने, त्रस्त झालेल्या ४० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी डॉ.सूर्यवंशी यांनी या मुलांच्या तक्रारी व प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेऊन, चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास या सर्व मुलांना दिला होता.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त रविकिरण पाटील यांना आपल्या कार्यालयात तातडीने बोलावून घेऊन मुलांना होणाºया त्रासाबाबत विचारणा करून महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून तत्काळ पुरुष गृहपाल नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आमच्या समस्येची अत्यंत काळजीने दखल घेऊन केवळ २४ तासांच्या आत महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्तीकेल्याबद्दल सर्व मुलांनी आनंद व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आभार मानले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई