शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; आठ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:04 IST

आरोग्य संरक्षणासाठी काळजी घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. परंतु अनेकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत कारवाई करून आतापर्यंत सुमारे ७ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्य संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महापलिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने आपल्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रांत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदी कोरोनाच्या प्रसारासाठी पूरक ठरणारे कृत्य करणाºया बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार सार्वजनिक स्थळी चेहºयावर मास्क, रूमाल न वापरणे याकरिता ५00 रुपये, रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी थुंकणे यासाठी १000 रुपये, सर्व दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदी व्यापारी तसेच त्या ठिकाणी खरेदीसाठी जाणाºया ग्राहकांकडून शारीरिक अंतराचे बंधन न पाळणे यासाठी २00 रुपये दंड ठोठावला जात आहे. दुसºयांदा हाच गुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे.लॉकडाऊनमध्ये सहकार्य करण्याचे आवाहनकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ३ जुलैच्या रात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत १0 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे व कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनची बंधने ही आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्य हितासाठी आहेत. याची नोंद घेऊन संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. सामाजिक अंतर न राखल्यास दुकानदार, ग्राहक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका