शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown News: मद्य, सिगारेटचा काळाबाजार सुरूच; लॉकडाउन वाढल्याने भावही वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:24 IST

शहरातील ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ व सीबीडी-बेलापूर या भागात अशाप्रकारची अवैध मद्यविक्री तेजीत सुरू आहे.

नवी मुंबई : लॉकडाउनमुळे मद्यविक्री व पान, सिगारेट आदी तंबाखूजन्य पदार्थांचा काळाबाजार तेजीत आला आहे. विशेष म्हणजे, लॉकडाउनचा कालावधी १७ मेपर्यंत वाढल्याने बंदी असलेल्या मद्यासह तंबाखूजन्य पदार्थांच्या काळाबाजारातील किमतीही वधारल्याचे दिसून आले आहे. काही संधीसाधूनी याचा फायदा घेतला असून विविध ब्रॅण्डच्या मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटची छुप्या पद्घतीने अवास्तव दराने विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे.

लॉकडाउनमुळे तळीरामांची चांगलीच कोंडी झाली आहे. तसेच बिडी, सिगारेट व तंबाखूचे व्यसन असणाऱ्यांचीसुद्धा मोठी गैरसोय झाली आहे. नेमकी हीच बाब ओळखून काहींनी या वस्तूंचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू केला आहे. ६00 ते १२00 रुपये दरम्यान मिळणारी दारूची एक बाटली आता चक्क पाच ते सात हजार रुपयांना विकली जात आहे. विशेष म्हणजे, पहिल्या लॉकडाउनमध्ये हीच बाटली २५00 ते ३000 रुपयांना विकली जात होती. वाईन शॉप्सचे चालकच हा गोरखधंदा करीत असल्याचे बोलले जात आहे. कोणत्याही ब्रॅण्डची दारू घेतली तरी किंमत पाच ते सात हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. नेहमीच्या ग्राहकांना हे विक्रेते मोबलाइवरून संपर्क साधतात. सध्याच्या परिस्थितीत तळीरामांसाठी दुसरा पर्याय उरला नाही. त्यामुळे विक्रेते मागेल ती किमत देऊन अनेक जण दारूची खरेदी करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील ऐरोली, घणसोली, वाशी, तुर्भे, सानपाडा, नेरुळ व सीबीडी-बेलापूर या भागात अशाप्रकारची अवैध मद्यविक्री तेजीत सुरू आहे.मोठ्या प्रमाणावर तंबाखूची अवैध विक्री मद्यविक्री प्रमाणेच सिगारेट व तंबाखूची मोठ्या प्रमाणात अवैध विक्री केली जात आहे.150 रुपयांचे सिगारेटचे एक पाकीट आता 400 रुपयांना विकले जात आहे.10 रुपयांना मिळणारी तंबाखूची पुडी 70 रुपयांना विकली जात आहे.या अवैध व्यवसायाला अनेक ठिकाणी पोलिसांचा छुपा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस