शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Lockdown: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद ठेवा; माथाडी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:30 IST

सुरक्षेसाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याची भूमिका

नवी मुंबई : महानगरपालिकेने ४ ते १३ जुलैदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु यामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला वगळले आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीही १० दिवस बंद ठेवावी, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने ४ जुलैपासून नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. १० दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे सांगताना दुसरीकडे सर्वाधिक गर्दी होणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीमध्ये आतापर्यंत अनेक माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, व्यापारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींचा मृत्यू झाला आहे. बाजार समितीमधील सर्व घटकांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीमधील सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याविषयी शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे.१० दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे सांगताना दुसरीकडे सर्वाधिक गर्दी होणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस