शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळ्यातील प्राणिगणनेवर लॉकडाऊनचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 02:09 IST

भारतात ३ मेपर्यंत लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने बौद्धपौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेवर लॉकडाउनचे सावट असणार आहेत.

वैभव गायकरपनवेल : कोविड १९ (कोरोना )या जागातील साथीच्या आजाराने सध्याचे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. भारतात ३ मेपर्यंत लॉकडाउन आहे. महाराष्ट्रात आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाल्याने बौद्धपौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेवर लॉकडाउनचे सावट असणार आहेत.विशेषत: वन्यप्रेमी, सेवाभावी संस्था (एनजीओ ) हे या प्राणिगणनेत वनविभागाला सहकार्य करीत असतात. मात्र, लॉकडाउनमुळे वन्यप्रेमींना या प्राणिगणनेपासून यावेळी वंचित राहावे लागणार आहे. यावर्षी ७ मे रोजी बौद्धपौर्णिमा आहे. मात्र, महाराष्ट्रातील लॉकडाउन पुढे ढकलला जाणार असल्याने यावर्षी प्राणिगणना होईल की नाही? याबाबत देखील शाशकंता निर्माण झाली आहे. त्यातच कर्नाळा अभयारण्य रायगड जिल्ह्यात आहे. जिल्ह्याला यापूर्वीच रेड झोन घोषित केल्याने वनविभागाला या प्राणिगणनेत या परिसरातील सेवाभावी संस्थांची मदत मिळणार नाही, हे निश्चित मानले जात आहे. १२.१५५ चौरस किलोमीटरच्या या अभयारण्य परिसरात सुमारे १४७ प्रजातीचे पक्षी राहतात. यात ३७ स्थलांतरित प्रकारच्या दुर्मीळ पक्ष्यांचा देखील समावेश आहे. यासह हिंस्त्र अशा वन्यजीवांचा वावरदेखील याठिकाणी आहे. बौद्धपौर्णिमेला पूर्ण चंद्र असल्याने इतर दिवसांच्या तुलनेत रात्री चंद्राचा प्रकाश जास्त असतो. रात्री पाणवठे आदी ठिकाणी प्राणी पाणी पिण्यासाठी आल्यावर ते वनविभागाने लावलेल्या नाईट मोड कॅमेºयात सहज कैद होतात. बौद्धपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ७ ते दुसºया दिवशी सकाळी ७ अशा २४ तासांत ही पक्षी-प्राण्यांची गणना होते. मागील वर्षी कर्नाळा अभयारण्यात ३७ विविध प्रजातीच्या प्राणी पक्ष्यांची नोंद करण्यात आली होती. या गणनेत बिबट्या मात्र कॅमेºयात मागील वर्षी कैद झाला नव्हता. बिबट्याचा वावर अभयारण्यात असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला होता.या प्राणिगणनेत दरवर्षी स्थानिक आदिवासी बांधव तसेच ग्रामस्थांची मदत घेतली जाते.मात्र लॉकडाउनमुळे वनविभागाला स्थानिकांची मदत देखील घेता येणार नसल्याने यावर्षी प्राणिगणना होणार की नाही? असादेखील प्रश्न उपस्थित होत आहे.>दुर्मीळ वन्यजीवांचे होऊ शकते दर्शनलॉकडाउनमुळे कर्नाळा अभयारण्य परिसरातील मानवी वावर, वाहनांची रेलचेल थांबल्याने अभयारण्यातील प्राण्यांचा मुक्तसंचार या ठिकाणी वाढला आहे. वन्यजीवांची गणना झाल्यास दुर्मीळ प्राण्यांची छबी कॅमेºयात कैद होण्याची शक्यता आहे.>बौद्धपौर्णिमेला होणाºया प्राणिगणनेबाबत आम्हाला अद्याप वरिष्ठांचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. ३० एप्रिलपर्यंत आम्ही आदेशाची वाट पाहणार आहोत.-पी. पी. चव्हाण,वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या