शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाधिकारी, सत्ताधारी नगरसेवकात शाब्दिक वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:18 IST

महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या शिक्षण प्रवेश अर्जवाटपाबाबत शिक्षणाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करीत, जाब विचारण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांना शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यात शुक्रवारी महापालिका मुख्यालयात वादावादी झाली.

नवी मुंबई : महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या शिक्षण प्रवेश अर्जवाटपाबाबत शिक्षणाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करीत, जाब विचारण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांना शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यात शुक्रवारी महापालिका मुख्यालयात वादावादी झाली. नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात विविध कारणांवरून यापूर्वीपासून वाद सुरू असून या प्रकारामुळे भविष्यात आणखी वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.महापालिकेच्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्यासाठीची अर्ज मुदत संपल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी डोळस यांनी शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्याकडे केली होती. त्या वेळी संगवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांत अर्ज देतो म्हणून सांगितले होते. दोन दिवसांनी डोळस पालकांसमवेत संगवे यांच्या कार्यालयात गेले, त्या वेळी संगवे यांनी सुमारे एक तास प्रतीक्षा करावयास लावून अर्ज देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप डोळस यांनी केला आहे. यासंदर्भात डोळस यांनी संगवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, या प्रकाराने संतापलेल्या डोळस यांनी संगवे यांच्या टेबलावर असलेल्या फाइल भिरकावल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अर्जासाठी आपण ३१ जानेवारी पर्यंतची मुदत दिली होती. वृत्तपत्रात तशा अशयाची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे, सदर शाळा आपण खासगी संस्थेला चालवायला दिली आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया या संस्थेमार्फतच केली जाते, असे असले तरी प्रत्येक लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. त्यामुळे अर्जाची मुदत वाढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे संगवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. याआधीही महापालिका अधिकारी आणि नगरसेवक हा वाद सुरू होता, हा वाद धुमसत राहणार असल्याची चर्चा रंगली आहे. डोळस आणि संगवे यांच्यातील हा वाद प्रातिनिधिक स्वरूपाचा असला तरी येत्या काळात तो चिघळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई