शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
2
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
5
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
6
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
7
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
8
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
9
पराभव समोर दिसू लागल्यानं खापर फोडण्याचं काम सुरू केलंय; सामंतांचा राऊतांना टोला
10
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
11
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
12
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
13
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
14
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
15
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
16
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
17
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
18
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
19
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

कळंबोलीमधील जनजीवन झाले सुरळीत; नागरिकांनी दाखविली निर्भयता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:16 PM

सुरक्षा यंत्रणेवर व्यक्त केला विश्वास; सर्व शाळा निर्भय वातावरणात सुरू

- अरुणकुमार मेहेत्रे पनवेल : कळंबोली वसाहतीमध्ये अगदी सुधागड स्कूलच्या बाजूला अज्ञात व्यक्तीने बॉम्बसदृश वस्तू ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची देशभरात दखल घेतली गेली. तर्क-वितर्क लावले गेले. मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा बाहेरून आली. माध्यमांवर वेगळ्या बातम्या या बाबत आल्या. असे असतानाही कळंबोलीकरांनी आपला संयम ढळू दिला नाही. इतकी मोठी घटना घडूनही जनजीवन विस्कळीत झाले नाही. यामुळे कळंबोलीकरांची निर्भयता पुढे आली, असे म्हणता येईल.कळंबोली वसाहत ही मोठी नागरी वसाहत आहे. लोकसंख्या ही दोन लाखांच्या पुढे आहे. सिडकोच्या बिल्डिंगबरोबरच खासगी घरेही कॉलनीत आहेत. पनवेल-सायन त्याचबरोबर मुंब्रा महामार्ग वसाहतीपासून जातात. बाजूला खूप मोठे लोह-पोलाद मार्केट आहेत. ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या वसाहतीमध्ये शाळासुद्धा आहेत. सांगण्याचे तात्पर्य इतकेच कळंबोली गजबजलेले आहे. आणि नेमके याच वसाहतीमध्ये बॉम्बसदृश वस्तू एका हातगाडीवर ठेवण्यात आली. ही हातगाडी काही तास रस्त्यावर उभी होती तरीसुद्धा ते याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कळंबोलीकरांना अंतर्गत सुरक्षेची हमी वाटते. सुधागड हायस्कूलच्या सुरक्षारक्षकाने ही वस्तू निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नवी मुंबईचे बॉम्बशोधक पथक त्या ठिकाणी आले. फायर ब्रिगेडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही वस्तू निकामी करण्याचा प्रयत्न केला गेला. पोलीस दलाचे प्रयत्न सुरू असताना या ठिकाणी कळंबोलीकरांनी काही प्रमाणात गर्दी केली होती; परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही भीती दिसत नव्हती. आमदार, नगरसेवक तसेच राजकीय मंडळी त्या ठिकाणी आली. त्यांचा व नागरिकांचा सुरक्षा यंत्रणेला कोणताही अडथळा झाला नाही. पोलीस यंत्रणेच्या कामात बाधा येईल असले कोणतेही वर्तन नागरिकांनी केले नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, सुधागड हायस्कूलच्या बाजूला बाजारपेठ आहे. दोन्ही बाजूंनी रांगेत दुकाने आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्याचे काम सुरू होते.एवढी मोठी घटना या परिसरात होऊनही सर्व दुकाने सुरू होती. रस्त्यांवरून लोकांची ये-जा सुरू होती. कुठेही वाहने अडवण्याची वेळ आली नाही. ज्या सुधागड शाळेसमोर ही बॉम्बसदृश वस्तू आढळली तिथेही कोणतीही गडबड दिसली नाही. नियमित वेळेतच शाळा सोडण्यात आली. मंगळवारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक देवेन भारती यांच्यासह अनेक बडे अधिकारी कळंबोलीत आले. त्याचबरोबर वसाहतीला एक प्रकारे लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असताना कळंबोलीकरांनी दोन्ही दिवस नियमित काम सुरू ठेवले.ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याला आमची पोलीस यंत्रणा नक्की शोधून काढेल. त्याचबरोबर या प्रकरणाचा छडाही लावेल. अशा या घटनांना संयम, एकतेने सामोरे जाणे हे आपल्या लोकशाहीला अभिप्रेत आहे आणि सोमवारी कळंबोलीकरांनी या गोष्टीचा साक्षात्कार दिला.- प्रशांत रणवरे,अध्यक्ष, कळंबोलीविकास समितीसोमवारी जी घटना घडली त्याबाबत अद्याप बºयाच गोष्टी समोर येणे बाकी आहे. लवकरच याबाबतची वस्तुस्थिती तपास यंत्रणा समोर आणतील याबाबत कळंबोलीतील नागरिक म्हणून मला दृढ विश्वास आहे. राहिला दुसरा मुद्दा भयाचा तर आम्ही अशा भ्याड गोष्टींना भीत नाही आणि त्यांना भीक घालत नाही.- किशोर ठोंबरे, रहिवासी कळंबोलीसोमवारी कळंबोलीत जी वस्तू सापडली ती नेमकी काय होती, याबाबत तपास यंत्रणा जास्त काही सांगू शकतील; परंतु दोन्ही दिवस कळंबोली वसाहतीतील नागरिकांमध्ये संयम दिसून आला आणि जबाबदार नागरिकांचे देशाप्रती हेच कर्तव्य असणे आवश्यक आहे. यावरून आपल्या सुरक्षा आणि तपास यंत्रणांवर फक्त विश्वास असल्याचे स्पष्ट होते.- अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर, कळंबोली